नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा नेहमीच आपल्या सडेतोड भाषणांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता 'असंसदीय भाषे'च्या वापरामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बुधवारी (7 फेब्रुवारी) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान त्यांनी 'आक्षेपार्ह' शब्दाचा वापर केला. यानंतर संसदेत बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपनंही त्यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. महुआ मोइत्रा या आधीही अनेकदा संसदेतील विधानांमुळे वादात अडकल्या आहेत. 'एपीबी'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
टीएमसीच्या खासदार असलेल्या महुआ यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्याकडे जेपी मॉर्गनसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव आहे. परदेशात मन न रमल्यामुळे त्या भारतात परत आल्या आणि राजकारणात प्रवेश केला. अगोदर त्या काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. पण, तिथे राजकीय फायदा न मिळाल्यानं त्या टीएमसीमध्ये दाखल झाल्या. आपल्या विधानांमुळे खूप चर्चेत असलेल्या महुआ यांना टीएमसीच्या 'फायर ब्रँड लीडर' म्हणून ओळखलं जातं.
यापूर्वी, 13 डिसेंबर 2022 रोजी महुआ यांच्या वक्तव्यानंतर गदारोळ झाला होता. त्यांनी भाजपला संसद सभागृहात विचारलं होतं की, तुम्ही वारंवार पप्पू शब्द वापरता, तुमच्या सरकारमध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे, मग सांगा खरा पप्पू कोण? दुसऱ्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती.
हेही वाचा - 'ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,' पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार
आता 'असंसदीय भाषे'च्या वापरामुळे त्यांच्याविरोधात संसदेत गदारोळ सुरू आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महुआ यांना पत्रकारांनी आक्षेपार्ह वक्तव्याबाबत प्रश्न विचारला होता. उत्तरात त्या म्हणाल्या, "भाजप आम्हाला संसदीय शिष्टाचार शिकवत आहे, याचं मला आश्चर्य वाटतं आहे. एका खासदारानं माझ्याशी गैरवर्तन केलं. मी सफरचंदाला सफरचंदच म्हणेन, संत्री नाही. त्यांनी मला विशेषाधिकार समितीत न्यावं मी तिथे माझी भूमिका मांडेन", असेही त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parliament, Parliament session