Home /News /national /

तृणमुल काँग्रेस आक्रमक; शिवसेना बंडखोर आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनबाहेर आंदोलन

तृणमुल काँग्रेस आक्रमक; शिवसेना बंडखोर आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनबाहेर आंदोलन

    गुवाहाटी, 23 जून : महाराष्ट्राचं राजकारण सध्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनच्या अवतीभवती फिरत आहे. याच रॅडिसन हॉटेल बाहेर आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हॉटेल बाहेर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. आसाममधील पूरस्थिती नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकीकडी ही परिस्थिती असताना आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची सौदेबाजी करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थितीमुळे लोक त्रासलेले आहेत. अनेकांचा यात मृत्यू झाला आहे. केंद्रातील भाजप सरकारने पूर पीडितांना एकाही पैशाचीही मदत केलेली नाही, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. 'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अजूनही शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आसामाचे CM घेणार भेट एकनाथ शिंदेना भाजपची ऑफर? भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Assam, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या