नवी दिल्ली 11 जुलै : भारतात असलेलं क्रिकेटचं प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेटचं वेड असलेल्या देशांमध्ये भारत अव्वल येतो. मात्र भारतातल्या काही राज्यांमध्ये फुटबॉलचंही तेवढच वेड आहे. फुटबॉलचं वेड असलेलं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचे खासदार प्रसून बॅनर्जी यांनी संसदेच्या आवाराच आज चक्क 'फुटबॉल' आणून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. क्रिकेट प्रमाणेच फुटबॉलच्या खेळाकडेही सगळ्यांनी लक्षं द्यावं असा त्यांचा उद्देश होता. संसदेच्या आवारात फुटबॉल खेळत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्लाही दिला. 'राजकारण कमी, खेळ आणि फुटबॉल जास्त' असं धोरण ठेवा असंही ते म्हणाले.
VIDEO : साप नव्हे या आहेत अळ्या, औरंगाबादेत एका गावावर केलं आक्रमण
भारताने विश्वचषकात खेळणं ही देशासाठी पर्वणीच असते. पण जगात क्रिकेट नाही तर फुटबॉलचं वेड असणारे जास्त चाहते आहेत. त्यामुळे भारताने एक दिवस फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणं हे आपलं स्वप्न असल्याचंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सर्व फुटबॉल प्रेमींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'राजकारण कमी, खेळ आणि फुटबॉल जास्त' असं धोरण पाहिजे असं आपण पंतप्रधानांना सांगणार असल्याचंही ते म्हणाले.
निदर्शने, घोषणाबाजी आणि राजकीय वाद विवाद यांनी कायम व्यस्त असलेल्या संसदेच्या आवारात आज एक खासदार फुटबॉल खेळत असल्याचं बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल या खेळाकडेही सगळ्यांनी लक्ष द्यावं असं आवाहनही बॅनर्जी यांनी केलं.
#WATCH Delhi: TMC MP Prasun Banerjee plays football in Parliament premises.Says "We want India to play Football World Cup one day. We're making efforts. We'll go to PM, along with footballers, & tell him 'Politics kam, sports zyada, football zyada.' That day will definitely come. pic.twitter.com/fEBVKncqhn
— ANI (@ANI) July 11, 2019
राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी 'अॅक्शन'मध्ये, काँग्रेसला अल्टिमेटम
तर ठाकरे स्टाईल आंदोलन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं देशभर आकर्षण आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आपल्या आंदोलनाची एक स्टाईल निर्माण केली. नंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही आपली एक स्टाईल निर्माण केली. गरज पडली तर 'मारा-झोडा-फोडा' अशी ती स्टाईल होती. आता या स्टाईलचं आकर्षण हरियाणातल्या एका बड्या नेत्याला पडलंय. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आणि जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यत चौटाला यांनी गरज पडली तर बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.