मराठी बातम्या /बातम्या /देश /

ममता बॅनर्जींच्यासमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा, नुसरत जहांची संतप्त प्रतिक्रिया

ममता बॅनर्जींच्यासमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा, नुसरत जहांची संतप्त प्रतिक्रिया

पश्चिम बंगालची (west bengal) राजधानी कोलकाता (kolkata) मध्ये एका सरकारी कार्यक्रमांत 'जय श्री राम' च्या घोषणा (jai shree ram sloganeering) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरू झालं आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जानेवारी: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका सरकारी कार्यक्रमात 'जय श्रीराम' च्या घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरू झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी देखील व्यासपीठावरुन या घोषणांबाबत आक्षेप नोंदवला आहे. यादरम्यान आता बॉलीवूड अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां यांनी देखील आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्वीट करत 'जय श्री राम' च्या घोषणा देणाऱ्यांचे कान टोचले आहेत. कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात 'जय श्रीराम' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर हा मुद्दा बंगालच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आला आहे. नुसरत जहां यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते.' कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी व्यासपीठावर गेल्या असता कार्यक्रमातील काही लोकांनी 'जय श्रीराम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ममता बॅनर्जी चिडल्या आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. लोकं शांत झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी त्यांचं भाषण थोडक्यात उरकलं. त्या म्हणाल्या की, सरकारी कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. सरकारी कार्यक्रमाला काहीतरी प्रतिष्ठा असते, त्यामुळे तुम्ही ज्याला आमंत्रित केलं आहे, त्यांचा अपमान करणं योग्य नाही. ममता बॅनर्जी यांनी आपल्या थोडक्यात केलेल्या भाषणात म्हटलं की, हा काही कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही तर हा एक सरकारी कार्यक्रम आहे.
First published:

Tags: Mamata banerjee, Narendra modi, TMC

पुढील बातम्या