Elec-widget

विमानातून प्रवास करताय तर हे एकदा वाचाच...

विमानातून प्रवास करताय तर हे एकदा वाचाच...

अवघे काही मिनिटंच माणूस जिवंत राहू शकतो

 • Share this:

मुंबई, २० सप्टेंबर- जेट एअरवेजच्या २ वैमानिकांकडून अक्षम्य घोडचूक घडली. विमानानं उड्डाण केल्यावर आतल्या हवेचा दाब राखण्याची यंत्रणाच सुरू करायला हे वैमानिक विसरले. ज्यामुळे अनेक प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. तर अनेकांना चक्करही आली. यामुळे ऑक्सिजनचे मास्क खाली आले, प्रवासी त्यातून श्वास घ्यायचा प्रयत्न करत होते. चूक लक्षात आल्यावर वैमानिकानं विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवलं, आणि प्रवाशांवर विमानतळावरच उपचार सुरू झाले. सुदैवानं, यात जीवितहानी झाली नाही. पण आणखी काही वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विमानात एकूण १६६ प्रवासी होते. घडल्या प्रकाराबाबत जेटनं माफी मागितली आहे, आणि सर्व क्रूला ड्युटीवरून निलंबित केल्याचं सांगितलंय. पण नेमकी कशामुळे प्रवाशांना त्रास झाला याबद्दल जाणून घेऊ...

 • विमानाची उंची जशी वाढत जाते, तसा हवेचा दाब कमी होतो.
 • पृथ्वीएवढा दाब राखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते.
 • त्याला केबिन प्रेशराईझेशन सिस्टिम असं म्हणतात.
 • Loading...

 • पृथ्वीवरचा साधारण दाब – १४.७ पीएसआय
 • १८ हजार फुटांवर हवेचा दाब – ७.३ पीएसआय
 • ३०- ४३ हजार फुटांवर हवेचा दाब - ४ पीएसआय
 • त्यामुळे विमानातला दाब कृत्रिमरित्या वाढवावा लागतो.
 • दाब वाढवला नाही तर रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं.
 • ऑक्सिजन कमी झाल्यानं मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.
 • अवघे काही मिनिटंच माणूस जिवंत राहतो.
 • काही मिनिटांनी श्वास गुदमरून माणसाचा मृत्यू होतो.
 • या प्रकारच्या घटनेला इंग्रजीत हिपॉक्सिया असा शब्द.

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 04:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...