मराठी बातम्या /बातम्या /देश /

IAS अधिकारी टीना डाबीनंतर EX पतीनेही उरकलं लग्न; दुसऱ्या पत्नीने मात्र घातल्या 3 अटी

IAS अधिकारी टीना डाबीनंतर EX पतीनेही उरकलं लग्न; दुसऱ्या पत्नीने मात्र घातल्या 3 अटी

लातूरची सून IAS अधिकारी टीना डाबी काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली आहे.

लातूरची सून IAS अधिकारी टीना डाबी काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली आहे.

लातूरची सून IAS अधिकारी टीना डाबी काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Srinagar, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : आयएएस अधिकारी टीना डाबी यांचं पहिलं लग्न त्यांचेच बॅचमेट आणि आयएएस अधिकारी असलेल्या अतहर खान यांच्यासोबत झालं होतं. परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता टीना डाबी यांनी मराठमोळे अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याच्या सून झाल्या. यानंतर आता अतहर खान यांनीही दुसरे लग्न केले आहे.

अतहर खान यांनी दोन महिन्यांपूर्वी डॉ. महरीन काझी हिच्याशी साखरपुडा केला होता. यानंतर या दोघांचे आज लग्न झाले. अतहर खान हे UPSC चा 2015 मध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाले होते. अतहर यांचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या फोटोग्राफरने याला दुजोरा दिला आहे. हा विवाह श्रीनगरमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काल एक दिवस आधी म्हणजेच 30 सप्टेंबरला मेहंदी सोहळा पार पडला.

आयएएस अतहरच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मेहरीन मेहंदी लावताना दिसत आहे. त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र, त्यांच्या पत्नी डॉ. महरीन काझी यांनी त्यांच्यासमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

काय आहेत या 3 अटी -

1. अतहरला प्रत्येक वेळी मेहरीनच बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल.

2. वर्षातून 2-3 वेळा मेहरीनला परदेशात फिरण्यासाठी घेऊन जावे लागेल.

3. महरीन जे काही मागेल, ते कुठेही असले तरी ते खरेदी करून द्यावे लागेल.

कोण आहे महरीन काझी -

श्रीनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर महरीन व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी मेडिसीनमध्ये एमडी केलं आहे. डॉ. महरीन काजी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठाशिवाय यूके आणि जर्मनीतून उच्च शिक्षण घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार महरीन श्रीनगरच्या लाल बाजार येथील राहणारी आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करीत होते.

First published:

Tags: Ias officer, Marriage