चक्क पैशांऐवजी तरुणावर आली कांदा लॉकरमध्ये ठेवण्याची वेळ, VIDEO VIRAL

चक्क पैशांऐवजी तरुणावर आली कांदा लॉकरमध्ये ठेवण्याची वेळ, VIDEO VIRAL

तुफान व्हायरल होणारे टिक टॉकवरील भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर: tik tok टिक टॉक अॅपवर रोज नवनवीन ट्रेडिंग व्हिडिओ येत असतात मात्र सध्या एका व्हिडिओने सोशल मीडावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या कांदा महाग झाला असून बाजारपेठेत किंवा अनेक दुकानांमध्ये कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कांदा चोरीला जाऊ नये म्हणून तरुणानं शक्कल लढवली आहे. यासोबत काही मजेशीर व्हिडिओही ट्रेन्ड होत आहेत. पाहा टॉप 5 टिक टॉक व्हिडिओ

अय्या चक्क लॉकरमध्ये कांदा ठेवण्याची वेळ

कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कांदे चोरले जावू नयेत म्हणून चक्क एका तरुणानं कपाडात लॉकरमध्ये कांदा लपवला आहे. त्याच्या बायकोलाही कांद्याला हात लावू देत नसल्याचा व्हिडिओ टिक टॉकसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सासरी गेलेल्या मुलीनं केला वडिलांना फोन अश्रू अनावर...

वडील आणि मुलीच्या नात्यातील अतुट प्रेमाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. लग्नानंतर सासरहून मुलीचा पहिला व्हिडिओ कॉल येतो आणि वडिलांना अश्रू अनावर होतात. त्यांना रडताना पाहून घरातील सदस्यांच्या डोळ्यातील पाण्याचा धीर सुटतो. डोळात पाणी आणणारा ह्या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि शेअरचा पाऊस पडला आहे.

या नवरात्रीत असा होणार गरबा...

भारतात परतीच्या पावसानं काही भागांमध्ये पावसानं चांगलच झोडपून काढलं आहे. काही भागांमध्ये पाणी साचलंय तर काही भागात नुसताच मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे गरबा कसा खेळायचा हा प्रश्न पडला आहे. गरबा प्रेमींनी खास त्यावर शक्कल लढवून असा भन्नट उपाय काढला आहे. चक्क हेल्मेट आणि रेनकोट घालून गरबा खेळला जात आहे.

प्राडा गाण्यात तरुणीचा भन्नाट परफॉर्मन्स

आलिया भट्टचा प्राडा गाणं खूप सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झालं आहे. टिकटॉकवर अनेकांनी या गाण्यावर हावभाव केले आहेत. त्यातीलच एका तरुणीच्या डोळ्यांचा हावभाव करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

First Published: Oct 3, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading