तरुणाला 5 किलो कांदा खरेदी करताना आले मुलीचे स्थळ, TikTok व्हिडिओ व्हायरल

तरुणाला 5 किलो कांदा खरेदी करताना आले मुलीचे स्थळ, TikTok व्हिडिओ व्हायरल

कांद्याच्या दरवाढीवरून टिकटॉकवर अनेक जण फनी व्हिडिओ (tiktok funny video) तयार करत आहे. असेच काही व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर : कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आलं आहे. सोशल मीडिया व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (social media platform tiktok) वरही कांद्याच्या भाव वाढीवर एकापेक्षा एक व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे. अनेक जण कांद्यावरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहे आणि ट्रोलही होत आहे.

कांद्याच्या दरवाढीवरून टिकटॉकवर अनेक जण  फनी व्हिडिओ (tiktok funny video) तयार करत आहे. असेच काही व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहे. एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जेवण करत आहे पण त्याच्या ताटात कांदा नाही. तर त्याने समोर दोरीला कांदा, टोमॅटो आणि लसून लटकून ठेवला आहे. त्यानंतर तो एक खास घेतो आणि नंतर कांद्याचा वास घेतो.  हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 1.5 कोटी लोकांनी पाहिला आहे.

दुसऱ्या एक व्हिडिओ आणखी गमंतीशीर आहे. हा व्हिडिओ लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो, "मी बाजारात 5 किलो कांदा खरेदी करत होतो, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या काकूंनी आपल्या पतीला विचारलं की हा मुलगा आपल्या रियासाठी कसा असेल.

"

या शिवाय आणखी असे काही व्हिडिओ आहे जे लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर 600 रुपये आणि त्याच्याबाजूला कांदा ठेवण्यात आला आहे. एक तरुणी समोरून चालत येते आणि कांदा घेऊन निघून जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या