मेट्रोमध्ये मुलाला छेडणाऱ्या तरुणीचा TikTok VIDEO व्हायरल

मेट्रोमध्ये मुलाला छेडणाऱ्या तरुणीचा TikTok VIDEO व्हायरल

टिक टॉक व्हिडिओवरही मुलं #metooचा ट्रेण्ड सुरू करणार?

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम लावता येत नाही. TikTok या अॅपनं सोशल मीडियावर वेगळं स्थान मिळवलं आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर #metoo चळवळ सुरू झाली होती. या चळवळीचा आधार घेऊन एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. तरुणीने मुलांना छळलं तर मुलांवरही #metoo म्हणायची वेळ येईल असं या व्हिडिओतून दाखवण्याचा एक प्रयत्न अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये मेट्रोमध्ये उभ्या असलेल्या तरुणाची कशी छेड काढतेय ही तरुणी तुम्ही पाहू शकता. तरुणी आपला हात तरुणाच्या हातावर ठेवते तर रागावलेला तरुण तिचा हात झटकून देतो. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका कॅफेटेरीयामध्ये तरुणी मुलासोबत वाईट फ्लर्ट करत असल्याचं दिसत आहे. ते पाहून तरुण तिथून पळ काढतो. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तर टिक टॉकवर हे व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. काहींनी या व्हिडिओची कमेंटमध्ये खिल्लीही उडवली आहे.

First published: November 4, 2019, 2:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading