मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये दिली जाते Tik Tok थेरपी, डॉक्टरच देतात हे चॅलेंज!

कोरोनाच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये दिली जाते Tik Tok थेरपी, डॉक्टरच देतात हे चॅलेंज!

एक दिवस डॉक्टरांचा डान्स करतानाचा व्हिडीओ रुग्णांना दिसला आणि या थेरेपीची सुरूवात झाली.  आणि सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

एक दिवस डॉक्टरांचा डान्स करतानाचा व्हिडीओ रुग्णांना दिसला आणि या थेरेपीची सुरूवात झाली. आणि सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

एक दिवस डॉक्टरांचा डान्स करतानाचा व्हिडीओ रुग्णांना दिसला आणि या थेरेपीची सुरूवात झाली. आणि सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली 21 जून: कोरोना व्हायरसवर (Coronavirus) अजुन कुठलेही औषध निघालेलं नाही. त्यामुळे सर्व जग त्यावर औषध शोधत आहे. देशात दररोज कोरोना कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर विविध पद्धतीचा वापर करत आहेत. मिझोरामच्या (Mizoram) डॉक्टरांनी तर एक अफलातून आयडिया काढली असून ते Tik Tokच्या माध्यमातून रुग्णांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यालाच आता Tik Tok थेरपी हे नाव पडलं असून त्याची चर्चाही होत आहे. मिझरामच्या लाँगतलाई जिल्ह्यातल्या एका कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी हा प्रयोग केला. त्याचे रिझल्टही चांगले आल्याने डॉक्टरांचाही उत्साह वाढला आहे. इंडियन एक्सप्रेसने याचं वृत्त दिलं आहे. या जिल्ह्याची सीमा बांगलादेश आणि म्यानमारला लागून आहे. दोन आठवड्यापूर्वी तिथे रुग्ण आढळायला सुरुवात झाली. मात्र त्याची संख्या अजुनही आटोक्यात आहे. या सेंटरवर डॉक्टरांनी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यात सेंटरची संबंधीत सर्व कर्मचारी तर असतातच त्याचबरोबर रुग्णांचाही त्यात समावेश केला जातो. एका दिवशी डॉक्टरांचा डान्स करतानाचा व्हिडीओ रुग्णांना दिसला आणि या थेरेपीची सुरूवात झाली. ज्या रुग्णांना फारसे लक्षणे नाहीत असे सर्व रुग्णांना डॉक्टरांनी डान्सचं चॅलेंज दिलं होतं. फक्त डान्सच नाही तर डॉक्टर्स त्यांना काही मजेदार चॅलेंजेस देऊ लागली. त्यातून डॉक्टर्स आणि रुग्णांनाही चांगलाच विरंगुळा मिळाला आणि त्यांचा ताणही हलका झाला. या सेंटरची प्रमुख आहे 31 वर्षांची डॉ. एल्‍साडई लालबरसायमा तिनेच या थेरेपीची सुरुवात केली असून त्याची चर्चा ईशान्येतल्या सातही राज्यांमध्ये होत आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे. हे वाचा -  लॉकडाऊनमध्ये तरुणाला बळावला विचित्र आजार; कित्येक तास मूर्तीसारखा राहतो उभा आमदाराच्या घरी Corona चा कहर; एकामागे एक 18 कुटुंबीय निघाले COVID पॉझिटिव्ह  
First published:

Tags: Coronavirus, Mizoram

पुढील बातम्या