VIDEO : भाजपकडून TikTok स्टार निवडणुकीच्या रिंगणात, फॉलोअर्सना केलं आवाहन

भाजपने जाहीर उमेदवारी जाहीर केल्यानंतर टिकटॉक स्टारने म्हटलं की, माझे फॉलोअर्स मी अर्ज भरण्याची वाट बघत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 12:58 PM IST

VIDEO : भाजपकडून TikTok स्टार निवडणुकीच्या रिंगणात, फॉलोअर्सना केलं आवाहन

चंदिगड, 04 ऑक्टोबर : हरियाणा विधानसभेसाठी भाजपने अखेरची उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने टिकटॉक स्टार सोनाली फोगटला उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर सोनालीने म्हटले की, माझे सर्व फॉलोअर्स मला पाठिंबा देतील. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ते वाट बघत आहेत. पक्षाने मला संधी दिली असून मला खात्री आहे की मी निवडणूक जिंकेन.

सोनाली फोगट टिकटॉक स्टार आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे.

याशिवाय काही व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल सुद्धा होतात.

Loading...

भाजपकडून सोनाली निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई आणि इंडियन नॅशनल लोकदलाकडून राजेश गोदरा हे निवडणूक लढणार आहेत.

सोनालीचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने शेवटची यादी बुधवारी रात्री जाहीर केली. यामध्ये 12 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये सोनालीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसकडून लढणाऱ्या कुलदीप यांनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणूक लढली होती.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...