Tiktokवर झालेल्या प्रेमानं केला घात, लग्नाची स्वप्न दाखवून आयुष्यभराची दिली वेदना

Tiktokवर झालेल्या प्रेमानं केला घात, लग्नाची स्वप्न दाखवून आयुष्यभराची दिली वेदना

हैदराबादमध्ये टिकटॉकवर ओळख झालेल्या एका मुलीला लग्नाचं वचन देऊन नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 18 मे : सध्या टिकटॉक (Tiktok) हे अॅप प्रत्येकाच्या फोनमध्ये असते. या अॅपमध्ये गाणी टाकून व्हिडीओ तयार केले जातात, सोशल मीडियावर या व्हिडीओची बरीच चर्चा असते. दरम्यान एकीकडे मनोरंजनासाठी या अॅपचा वापर केला जात असताना मात्र टिकटॉकमुळं एक भयंकर प्रकार घडला, यामुळं संपूर्ण हैदराबाद हादरून गेलं. हैदराबादमध्ये टिकटॉकवर ओळख झालेल्या एका मुलीला लग्नाचं वचन देऊन नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय तरुणी आणि 34 वर्षीय अकबर शाह यांची ओळख टिकटॉकवर झाली. त्यानंतर ते फोनवर एकमेकांशी बोलू लागले. पोलिसांनी सांगितले की, अकबरनं तरुणीला तो तिच्यावर प्रेम करत असून, लग्न करणार असल्याचेही सांगितले. लग्नाची बोलणी करण्याचे कारण देऊन अकबरनं तरुणीला आपल्या बहिणीच्या घरी तोलीचौकी येथे बोलवले. तिथं या तरुणीवर अकबरनं बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, अकबरनं त्याच्या घरच्यांसमोर तरुणीसोबत खोटा साखरपूडाही केला. त्यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

वाचा-राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना

दरम्यान, पोलिसांनी अकबरला अटक केली असून, त्याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहे. मुख्य म्हणजे अकबार शाह याचे लग्न करून त्याला 4 मुलंही आहेत.

वाचा-दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, चॉकलेटचं आमीष दाखवून नराधमानं असा साधला डाव

वाचा-पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा निर्घृण खून

First published: May 18, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या