TikTok वर व्हिडिओ बनवणाऱ्यांनो सावधान, कंपनीने काढून टाकले 60 लाख व्हिडिओज

TikTok वर व्हिडिओ बनवणाऱ्यांनो सावधान, कंपनीने काढून टाकले 60 लाख व्हिडिओज

तुम्ही जर टिकटॉक वर व्हिडिओज बनवत असाल तर तो कंटेंट बेकायदेशीर आणि देशविरोधी नाही ना हे तपासून घ्यायला हवं. कंपनीने आतापर्यंत असे 60 लाख व्हिडिओज हटवले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : चायनीज व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकने या प्लॅटफॉर्मवरचे 60 लाख व्हिडिओज काढून टाकले आहेत.भारतात असलेल्या गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली,असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टिकटॉकवरून बेकायदेशीर आणि अश्लील कंटेंट काढणं हा या कारवाईचा उद्देश होता. सरकारने टिकटॉकला एक नोटीस पाठवली आहे. या नोटिसीमध्ये सरकारने टिकटॉकला 21 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर आलं नाही तर टिकटॉकवर बंदी आणली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे.

टिकटॉकचा वापर देशविरोधी कामांसाठी होत नाही ना याची खबरदारी कंपनीने घ्यावी, असंही सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर लोकांबद्दलची माहिती भविष्यात कोणत्या सरकारला दिली जाणार नाही याचीही हमी कंपनीला द्यावी लागणार आहे. भारतात टिकटॉकचे 20 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. टिकटॉकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये कोणत्याही हानीकारक तत्त्वाचं प्रमोशन केलं जात नाही, असं टिकटॉकचे भारतातले संचालक सचिन शर्मा यांनी म्हटलं आहे.

ज्या व्हिडिओजमध्ये चुकीचा कंटेंट आढळला असे 60 लाख व्हिडिओज कंपनीने हटवले आहेत. यामध्ये जुलै 2018 पासून आतापर्यंतच्या व्हिडिओजचा समावेश आहे.

अलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त नाही पण लेहंगा ठरला!

टिकटॉक हे एक सोशल मीडिया अ‍ॅप आहे. या माध्यमातून स्मार्टफोन युजर छोटेछोट व्हिडिओ बनवून शेअर करत असतात. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे कोणीही युजर त्याच्या आवाजातला व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही. युजरने फक्त लिपसिंक करून व्हिडिओ बनवायचा असतो. हा व्हिडिओ 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ बनवता येत नाही.

भारतामध्ये तरुणांमध्ये हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. टिकटॉकवर व्हिडिओ बनवून काहीजण टिकटॉक स्टारही बनले आहेत.

===============================================================================================

VIDEO: गायिका वैशाली माडे 'या' कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या