News18 Lokmat

TikTok वर बंदी : सरकारकडून अ‍ॅपल आणि गुगलला अ‍ॅप काढून टाकण्याच्या सूचना

केंद्र सरकारने आता गुगल आणि अ‍ॅपल कंपनीला टिकटॉक अ‍ॅप काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 12:34 PM IST

TikTok वर बंदी : सरकारकडून अ‍ॅपल आणि गुगलला अ‍ॅप काढून टाकण्याच्या सूचना

नवी दिल्ली, 16 एप्रिल : सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेल्या 'टिक टॉक'या मोबाईल व्हिडीओ अ‍ॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर आता केंद्र सरकारने आता गुगल आणि अ‍ॅपल कंपनीला टिकटॉक अ‍ॅप काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोर्टाने प्रसार माध्यमांना टिक टॉकवरील व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. यानंतर आता हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.

मदुराई उच्च न्यायालयाच्या टीक टॉकवरील बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र तात्काळ सुनावणीस नकार दिला आहे. टीक टॉकच्या डाऊनलोडिंगवर बंदी घालण्याचे आदेश मदुराई उच्च न्यायालयानं दिले होते. टिक-टॉक अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ असल्याने कोर्टाने हे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

टिक टॉक हे चीनमधील एका कंपनीचे अ‍ॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ असून त्यामुळे देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं बंदीचा आदेश दिला होता. फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडू सरकारमधील मंत्री ए.मनिकंदन यांनी सांगितले होते की, 'राज्य सरकार केंद्राकडे हे अ‍ॅप बंद करण्याची मागणी करणार आहे'.

Loading...

टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने छोटे व्हिडीओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. या अ‍ॅपचे सध्या भारतात 1.3 बिलियन युझर्स आहेत.


VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...