टिकटॉकमुळे तब्बल 3 वर्षांनी लागला घर सोडून गेलेल्या नवऱ्याचा शोध!

टिकटॉकमुळे तब्बल 3 वर्षांनी लागला घर सोडून गेलेल्या नवऱ्याचा शोध!

टिकटॉक व्हिडिओची सध्या खूपच क्रेझ आहे. पण याच अ‍ॅपमुळे एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध लागला. ही व्यक्ती आपली पत्नी आणि मुलांना सोडून गेली होती. पण टिकटॉक अ‍ॅपमुळे पोलिसांनी त्यांना शोधून काढलं.

  • Share this:

चेन्नई, 3 जुलै : व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर यामुळे एकमेकांच्या संपर्कात असणं सोपं झालं आहे. त्यातच शेअरचॅट, हॅलो, टिकटॉक अशा अ‍ॅपची भर पडली आहे.

काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर म्युझिक व्हिडिओ बनवल्याप्रकऱणी ओडिशामधल्या नर्सेसवर कारवाई झाली होती.या नर्सेसनी नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात टिकटॉक व्हिडिओ बनवला. याबद्दल त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.

असं असलं तरी याच टिकटॉकमुळे तामिळनाडूमध्ये एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध लागला आहे. ही व्यक्ती आपली पत्नी आणि मुलांना सोडून गेली होती. पण टिकटॉक अ‍ॅपमुळे पोलिसांना त्यांना शोधून काढता आलं.

तामिळनाडूमधल्या विल्लूपुरममध्ये राहणारे सुरेश 2016 मध्ये आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून पळून गेले होते. त्यांची पत्नी जयाप्रदा त्यामुळे खूपच चिंतेत होत्या. जयाप्रदा आपल्या दोन मुलांना घेऊम कसेबसे दिवस काढत होत्या.

एकदा मात्र एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. जयाप्रदा यांच्या कुणीतरी नातेवाईकांना हे सुरेश टिकटॉक अ‍ॅपवर दिसले. जयाप्रदा यांनी याआधीही पोलिसांत तक्रार केली होती पण त्यांचा शोध लागत नव्हता. यावेळी मात्र जयाप्रदा यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि टिकटॉक अ‍ॅपवर असलेल्या त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी मग त्यांचा शोध घेतला तेव्हा सुरेश सापडले. पोलिसांनी त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाकडे पाठवलं आहे. सुरेशने आपल्या कुटुंबाला सोडलं होतं पण तो एका तृतीयपंथियांच्या गटाच्या संपर्कात होता. तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेमार्फत पोलिसांना सुरेश यांचा शोध लागला.

कुटुंबाची जबाबदारी झटकून निघून गेलेल्या आपल्या पतीचा शोध लागल्याबद्दल जयाप्रदा यांनी टिकटॉक अ‍ॅपचे आभारच मानले असावेत !

=======================================================================================

LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading