विकृतीचा कळस! Tik Tokवर फेमस होण्यासाठी सापासोबत केला डान्स नंतर जिवंत जाळलं

विकृतीचा कळस! Tik Tokवर फेमस होण्यासाठी सापासोबत केला डान्स नंतर जिवंत जाळलं

चारही तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मार्च : टिक टॉक व्हिडीओनं सर्वांना भुरळ घातली आहे. तरुणतर टिक टॉकच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे. कधी जीवघेणे स्टंट तर कधी प्रयोग 30 सेकंदात प्रसिद्धी मिळवण्याचं साधन म्हणून टिक टॉकची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याच टिक टॉकवर आता विकृतीचं दर्शन होताना पाहायला मिळालं. चार तरुणांनी सापासोबत गुजराती गाण्यावर डान्स करत टिक टॉक व्हि़डीओ तयार केला आहे. सापासोबत डान्स करून मन न भरल्यानं त्यांनी जिवंत सापाला जाळलं आणि त्यासमोर व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सापाला जिवंत जाळून व्हिडीओ तयार करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चौघांवर वन्य विभाग आणि वन्य प्राणी अत्याचारांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुजरातच्या महीसागर जिल्ह्यात घडली आहे.

टिक टॉक व्हि़डीओ करण्यासाठी प्रत्येक तरुण उत्सुक असतो मात्र इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करण्याच्या नादात अशाप्रकारे विकृती करून व्हिडीओ काढणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. या चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या महीसागर जिल्ह्यातील बालासिनोर परिसरात चार तरुणांनी एका सापाला पकडलं. त्या सापासोबत पकडून डान्स केला गुजराती गाण्यावर त्यांनी टिक टॉक व्हिडीओ तयार केला आणि व्हायरल केला. त्यानंतर या तरुणांनी सापाची निर्घृण हत्या केली आणि पुरावे मिटवण्यासाठी सापाला जाळून टाकलं. सापाला जाळतानाचा व्हिडीओ त्यांनी तयार केला. हा व्हिडीओ 05 मार्चला तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं कारवाई केली.

हे वाचा-कोरोनाची भीती कायम, सेलिब्रिटी कपलवर आली लग्न पुढे ढकलायची वेळ

तीन दिवसांमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विकृत तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांची सध्या चौकशी सुरू आहे. हटके टिक टॉक तयार करण्याच्या अशा प्रकारची विकृती कऱणं चुकीचं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हे वाचा-पुरुषांमध्येही वाढतोय स्तनांच्या कॅन्सरचा धोका, पाच वर्षात 21 टक्क्यांची वाढ

First published: March 9, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या