Elec-widget

'त्या' 15 सेकंदाच्या Tik Tok VIDEO मुळे बदललं आयुष्य

'त्या' 15 सेकंदाच्या Tik Tok VIDEO मुळे बदललं आयुष्य

मनोरंजन म्हणून वापरलं जाणाऱ्या टिक टॉक व्हिडिओमुळे असं बदललं आयुष्य.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर: चायना मेड असणारं टिक टॉकने मात्र लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना वेड लावलं आहे. 2019 मध्ये भारतात सर्वांत जास्त वापरलं जाणारं लोकप्रिय अॅप म्हणून टिक टॉकचा उल्लेख केला जातो. 15 सेकंदात तुम्ही वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करायचा असतो. या अॅपमुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली काही जणांना रोजगाराची संधी मिळाली तर काही जणांची आयुष्य बदलली. अनेकांच्या सुप्त आणि सुपिक कल्पनांना या प्लॅटफॉर्मद्वारे वाव मिळाला.

टिक टॉकवर आता एक नवीन ड्रेन्ड तयार होताना पाहयला मिळत आहे. #herstory या ट्रेन्डचा उद्देश स्त्रियांमधील कलागुणांना वाव देण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला एक प्लॅटफॉर्म देणं हा आहे.

खाद्यपदार्थ, संगीत, कला भ्रमंती, अभिनय, विविध विषयांवर भाष्य करणं अशा अनेक गोष्टींवर तुम्ही 15 सेकंदाचे व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकता.

टिक टॉकमुळे कसं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं हे जाणून घेण्यासाठी 3 महिलांसोबत चर्चा केली.

गीत

Loading...

87 वर्षीय गीता यांनी त्यांचे कॉमेडी व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड केले. संगीता जैन यांना टिक टॉकवर गीता म्हणून नव्यानं ओळख मिळाली.वयाच्या 10 व्या वर्षा एका अपघातानंतर त्यांना पॅरालिसिस झाला आणि तेव्हापासून विलचेअर त्यांचा आधार बनला. त्यांनी काही सकारात्मक प्रेरणा देणारे व्हिडिओ पोस्ट केले. सासू-सुनेच्या नात्यांवर त्यांनी भाष्य करणारे व्हिडिओ पोस्ट केले आणि त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.

'तुमच्या व्हिडिओमुळे माझं आयुष्य बदललं. तणावातून बाहेर येण्याची प्रेरणा मिळाली आणि मी विचारही केला नव्हता की इतक्या कमी सेकंदाचे व्हिडिओ आयुष्याला अशा एका वेगळ्या पद्धतीनं कलाटणी देतील.' अशा जेव्हा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येण्यास सुरुवात झाली तेव्हा गीता यांना अधिक प्रेरणा आणि व्हिडिओ करण्यासाठी बळ मिळालं.

गीता सध्या टिक टॉकच्या माध्यमातून सोप्या पद्धतीनं इंग्रजी शिकवतात. त्यांचे जवळपास 4.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

इम्रान खान यांची भाषा बदलली, म्हणाले, आम्ही भारतावर हल्ला करणार नाही

शिवानी कपिला

शिवानी या रांचीच्या रहिवासी. लग्नानंतर त्या सुरतमध्ये राहण्यासाठी आल्या. त्यांनी हातची नोकरी सोडून पूर्णवेळ टिक टॉक व्हिडिओ करण्यास पसंती दिली. आजच्या घडीला त्यांचे 3.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांनी 2017 पासून कुत्र्यांचे प्राण्यांचे व्हिडिओ करून पोस्ट करत होती. त्यानंतर 2018 पासून तिने पूर्ण वेळ सोशल मेसेज देणारे, मोटिवेशनल, सामाजिक प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली.

'त्या म्हणतात मी रोज स्वत: कडे पाहाते. स्वत:ला एक वेगळी प्रेरणा देते. या प्लॅटफॉर्ममुळे  मला एक वेगळी ओळख मिळाली. ज्याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता.मला माझी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी या प्लॅटफॉर्मने दिली.'

फिजा अबिदी

फिजा यांना मागच्या वर्षी या अॅपची माहिती मिळाली आणि त्यांनी मित्र-मैत्रिणींचे व्हिडिओ पाहून टिक टॉक व्हिडिओ तयार करणं सुरू केलं. ब्युटी टीप्स, ब्युटी व्हि़डिओ तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी टिक टॉकच्या टीमसोबत याबाबत चौकशी केली त्यावेळी आणखी व्हिडिओ अपलोड करण्याबाबत सांगितलं. फिजा यांचं वय 32 वर्ष आहे. त्या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट, ब्लॉगर म्हणून काम करतात.

'ब्युटी रिलेटेड कंटेन्ट हा टिक टॉकवर इतका प्रसिद्ध होऊ शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त 15 सेकंदात अशा पद्धतीचं व्हिडिओ करणं आव्हान तर होतच पण लोकप्रियता किती मिळेल याबाबत साशंका होती मात्र लोकांना आवडलं.'

Xiaomi चा सर्वात स्वस्त फोन, जाणून घ्या Redmi 8A ची दमदार फीचर्स आणि किंमत

या प्लॅटफॉर्ममुळे मला वेगवेगळ्या ब्रॅण्डकडून ऑफर्स आल्या. या प्लॅटफॉर्मने मला माझ्या आयुष्यातील करियरचा एक वेगळा दर्जा मिळवून दिला. एक वेगळी प्रेरणा, पैसा, प्रसिद्धी आणि नव्या संकल्पना मांडण्यासाठी याचा उपयोग मला झाला. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भारतात अगदी गावाखेड्यापासून ते अगदी चिमुरड्यांपर्यंत लोकप्रिय झालं खरं मात्र याच टिक टॉकने फक्त प्रसिद्धीच नाही तर अशा पद्धतीचा इन्कमसोर्स, संधी आणि #herstory च्या माध्यमातून महिलांमधील सूप्त गुणांना वाव देऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मच दिला आहे.

गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...