इम्रान खान यांच्या ऑफिसमध्ये घुसली Tik Tok गर्ल आणि खुर्चीवर बसून केला VIDEO

परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जाऊन VIDEO करणाऱ्या Tik Tok गर्लवर कारवाई होणार?

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 09:48 AM IST

इम्रान खान यांच्या ऑफिसमध्ये घुसली Tik Tok गर्ल आणि खुर्चीवर बसून केला VIDEO

इस्लामाबाद, 25 ऑक्टोबर: कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात Tik Tok गर्ल गेली आणि तिने तिथे व्हिडिओ तयार केले आहे. या Tik Tok गर्लचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हरीम शाह असं या तरुणीचं नाव आहे. जी या व्हिडिओमध्ये परराष्ट्र मंत्रालयात घुसून थेट व्हिडिओ करताना दिसते आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन या तरुणीने व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल केला जात आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

ही तरुणी परराष्ट्र मंत्रालयात जाते. तिथे फोटो काढते आणि हिंदी गाण्यांवर टीक टॉक व्हिडिओ तयार करते आणि सोशल मीडियावर शेअर करते. इतकच नाही तर पंतप्रधान इम्रान खान ज्या खुर्चीवर बसतात चक्क त्या खुर्चीत बसून तरुणी व्हिडिओ करत असल्याचंही यामध्ये दिसत आहे.

Loading...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर मात्र पाकिस्तान सरकारकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर Tik Tok गर्ल हरीम शाह हीच्या म्हणण्यानुसार तिने परवानगी घेऊन परराष्ट्र मंत्रालयात गेली असल्याचा दावाही केला आहे. नियमांविरोधात असेल तर अधिकाऱ्यांनी परवानगीच कशी दिली असा सवालही तिने उपस्थित केला आहे. व्हिडिओ तयार करायला परवानगी नव्हती तर त्यांनी तसं आधी सांगायला हवं होतं असंही हरीम शाहने म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेमकी कोणावर कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ह्या तरुणीने अशा प्रकारचे व्हिडिओ काढलेच कसे? याबाबतही चौकशी होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...