S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

टीक टॉक VIDEO अ‍ॅपवर येणार बंदी? सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला

टीक टॉकवरील बंदीचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

Updated On: Apr 8, 2019 01:20 PM IST

टीक टॉक VIDEO अ‍ॅपवर येणार बंदी? सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला

नवी दिल्ली, सुशील पांडे, 08 एप्रिल : सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या 'टिक टॉक'या मोबाईल व्हिडीओ अ‍ॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले आहेत. कोर्टाने प्रसार माध्यमांना टिक टॉकवरील व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. यानंतर आता हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. मदुराई उच्च न्यायालयाच्या टीक टॉकवरील बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र तात्काळ सुनावणीस नकार दिला आहे. टीक टॉकच्या डाऊनलोडिंगवर बंदी घालण्याचे आदेश मदुराई उच्च न्यायालयानं दिले होते. टिक-टॉक अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ असल्याने कोर्टाने हे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

टिक टॉक हे चीनमधील एका कंपनीचे अ‍ॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ असून त्यामुळे देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं बंदीचा आदेश दिला होता. फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडू सरकारमधील मंत्री ए.मनिकंदन यांनी सांगितले होते की, 'राज्य सरकार केंद्राकडे हे अ‍ॅप बंद करण्याची मागणी करणार आहे'.


टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने छोटे व्हिडीओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. या अ‍ॅपचे सध्या भारतात 1.3 बिलियन युझर्स आहेत. त्यामुळे आता यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे.


VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close