तुमच्या मोबाइलमध्ये आता TikTok अ‍ॅप डाऊनलोड होणार नाही, कारण...

देशातील कोणत्याही नागरिकाच्या मोबाइलमध्ये आता टिक-टॉक अ‍ॅप डाऊनलोड होणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 09:40 AM IST

तुमच्या मोबाइलमध्ये आता TikTok अ‍ॅप डाऊनलोड होणार नाही, कारण...

नवी दिल्ली, 17 एप्रिल : देशातील कोणत्याही नागरिकाच्या मोबाइलमध्ये आता टिक-टॉक अ‍ॅप डाऊनलोड होणार नाही. कारण TikTok व्हिडीओ अ‍ॅप प्ले स्टोअरमधून हटवण्यात आलं आहे. युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवरही ब्लॉक करण्यात आले आहे. देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मंगळवारी (16 एप्रिल)गुगल आणि अ‍ॅपल कंपनीला आपल्या अ‍ॅप स्टोअरमधून TikTok व्हिडीओ अ‍ॅप हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

यापूर्वी मद्रास हायकोर्टानंही टिक टॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात टिक टॉक अ‍ॅपची चिनी कंपनी Bytedance Technology नं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टानं कंपनीची याचिका फेटाळून लावत कोणताही दिलासा दिला नाही. इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं दिलेला आदेश अपमानकारक, भेदभावपूर्ण असल्याचं टिक टॉप अ‍ॅप कंपनीनं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही चुकीच्या कारणांवरून अ‍ॅपला जबाबदार ठरवता येणार नाही, अशी बाजूदेखील कंपनीनं मांडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

टिक टॉक हे चीनमधील Bytedance Technology या कंपनीचे अ‍ॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ बनवण्यात येत असून त्यामुळे देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत टिक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं बंदीचा आदेश दिला होता.

टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने काही सेकंद/मिनिटांचे व्हिडीओ तयार करून त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात.

Loading...

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT: आश्वासनाचा पुणे पॅटर्न, हेल्मेटचं चिन्ह मिळताच सक्ती रद्द करण्याचं आश्वासन


बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवार मैदानात, 6 सभा घेणार


'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTubeवरून गायब

VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: tik tok
First Published: Apr 17, 2019 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...