भुवनेश्वर, 4 मार्च: देशातल्या वाघांचं हक्काचं स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्याघ्रप्रकल्पातच वणवा (Wildfire in odisha tiger reserve) लागला. जंगलाला लागलेली ही आग (forest reserve under fire) आठवडा झाला तरी अजून पूर्ण विझलेली नाही. एका राजकन्येच्या (Princess of mayurbhanj) ट्वीटमुळे याविषयी सोशल मीडियावर वणवा पेटल्यानंतर आता आठवडाभराने प्रशासन खडबडून उठलं आहे. मुख्यमंत्र्यांनीच तातडीच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ही घटना आहे ओडिशामधली. ओडिशातल्या सिमिपाल अभयारण्यात गेले सात दिवस आग धुमसते आहे. शेकडो वृक्ष या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर आता आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या वणव्याविषयी माहिती घेतली. आता उच्चस्तरीय समिती नेमून जंगलाची आग आटोक्यात आणण्याची उपाय योजना आखली जात आहे. "सिमीपाल अभयारण्याला लागलेली आग म्हणजे जगाच्या मौल्यवान संपत्तीला लागलेला वणवा आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री पटनायक यांनी या घटनेची नोंद केली आहे. वणव्यांमुळे यापुढे जंगलाची आणि तिथल्या अमूल्य वन्यजीवनाची हानी पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जंगलाला लागलेली ही आग आठवडा झाला तरी अजून पूर्ण विझलेली नाही. सोशल मीडियावर याविषयी वणवा पेटल्यानंतर आता आठवडाभराने प्रशासन खडबडून उठलं आहे.
राजकन्येच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर पेटला वणवा
ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात येणारं हे जंगल 2700 किमी एवढ्या प्रचंड भागात पसरलं आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती आणि वन्यजीवांचं हे अभयारण्य हक्काचं वसतीस्थान आहे. 21 फॉरेस्ट रेंजमध्ये या अभायरण्याची व्याप्ती आहे. त्यातल्या 8 रेंजेसमध्ये वणवा भडकला आहे. गतकाळच्या राजघराण्यातल्या व्यक्तीने याविषयी वाच्यता केल्यानंतर सोशल मीडिया पेटला. याविषयी ट्विटरवर चिंता व्यक्त करत राजकन्या अक्षिता भंज देव यांनी जगातल्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बायोस्फिअर पेटल्याची दखल नॅशनल मीडियाने घेतलेली नाही याविषयी खंतही व्यक्त केली होती.
Mayurbhanj had devastating forest fires this past week, a week ago close to 50kg of ivory was found, a few months ago local youth reported on sand/timber mafias in Simlipal. Apart from a few state media, NO national media is covering Asia’s 2nd largest biosphere burning #simlipal
— Akshita M. Bhanj Deo (@TheGreatAshB) March 1, 2021
अखेर त्यांच्या या ट्वीटनंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर यांनीही नोंद घेत यासंदर्भात ट्वीट केलं. जावडेकरांनी आपण कार्यवाहीचे आदेश दिल्याची माहिती दिली आणि मग ओडिशातलं प्रशासन कामाला लागलं.
हे वाचा - सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना जानेवारीपासून नाही मिळाला पगार
कोण आहे राजकन्या अक्षिता?
स्वातंत्र्यपूर्व भारतात हा भाग मयूरभंज संस्थानाचा होता. या संस्थानाचे राजे भंजदेव या नावाने ओळखले जायचे. अक्षिता भंजदेव या भंज राजघराण्याचे 47 वे राजे प्रवीणचंद्र भंजदेव यांच्या कन्या. आता मयूरभंज संस्थान ओडिशाचा भाग झालं आहे आणि राजघराणं बरखास्त झालं आहे.
आग आटोक्यात
प्रशासननाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार सिमिपाल अभयारण्याची आग आता आटोक्यात आली आहे. वणवा विझला असला तरी आता पुन्हा धुमसू नये म्हणून पूर्ण शांत करण्याचं काम सुरू आहे. या वणव्यात दुर्मीळ प्रजातींपैकी कुठल्या वन्यप्राण्याचा जीव गेला नसल्याचं वनखात्याचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Odisha