मराठी बातम्या /बातम्या /देश /थरारक! जिप्सीभोवती वाघाच्या प्रदक्षिणा, पर्यटकांच्या अंगावर आला काटा; पाहा VIDEO

थरारक! जिप्सीभोवती वाघाच्या प्रदक्षिणा, पर्यटकांच्या अंगावर आला काटा; पाहा VIDEO

अभयारण्यात अचानक वाघ समोर (Tiger makes rounds of tourist’s Gipsy in forest reserve) येऊन जिप्सीभोवती प्रदक्षिणा घालू लागल्यानंतर पर्यटकांच्या पोटात अक्षरशः भितीने गोळा उभा राहिला.

अभयारण्यात अचानक वाघ समोर (Tiger makes rounds of tourist’s Gipsy in forest reserve) येऊन जिप्सीभोवती प्रदक्षिणा घालू लागल्यानंतर पर्यटकांच्या पोटात अक्षरशः भितीने गोळा उभा राहिला.

अभयारण्यात अचानक वाघ समोर (Tiger makes rounds of tourist’s Gipsy in forest reserve) येऊन जिप्सीभोवती प्रदक्षिणा घालू लागल्यानंतर पर्यटकांच्या पोटात अक्षरशः भितीने गोळा उभा राहिला.

भोपाळ, 11 ऑक्टोबर : अभयारण्यात अचानक वाघ समोर (Tiger makes rounds of tourist’s Gipsy in forest reserve) येऊन जिप्सीभोवती प्रदक्षिणा घालू लागल्यानंतर पर्यटकांच्या पोटात अक्षरशः भितीने गोळा उभा राहिला. नेहमीप्रमाणे वाघ पाहण्यासाठी जिप्सीतून जंगलात (Tiger appeared before tourists) फेरफटका मारत असताना अचानक वाघ महाराज समोर अवतरले आणि नेहमीप्रमाणे निघून न जाता ते पर्यटकांच्या जिप्सीकडं चालत येऊ लागले.

पर्यटकांना भरली धडकी

अचानक वाघ समोर आल्यानंतर दोन्ही बाजूच्या पर्यटकांनी गाड्या थांबवल्या आणि वाघाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणं आपल्या वाटेनं न जाता वाघानं आपला मोर्चा पर्यटकांच्या दिशेनं वळवला. मध्यप्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमध्ये हा प्रकार घडला. वाघ जवळ येत असल्याचं लक्षात आल्यावर पर्यटकांची बॉडी लँग्वेज बदलल्याचं दिसू लागलं. एकानं बंद असणारी जिप्सी सुरू केली आणि संकट उभं ठाकलंच, तर तिथून पळ काढण्याची तयारी केली. वाघ ज्या गाडीच्या जवळ आला, त्या गाडीच्या चालकाला इतरांनी सूचना द्यायला सुरवात केली. कुणी म्हणालं गाडी मागे घे, कुणी म्हणाले पुढे घे. काही काळ वाघानं या गाडीभोवती चकरा मारल्या आणि तो आपल्या मार्गानं निघून गेला. " isDesktop="true" id="616514" >

पर्यटकांचा ओघ वाढला

श्रावण महिना संपल्यानंतर अभयारण्याची दारं पर्यटकांसाठी खुली होतात. यंदा पावसाळा संपत आला असताना आता अभयारण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांत पर्यटकांना जंगल सफारीची संधी मिळालेली नाही. त्यामुळं यंदा पर्यटकांची पावलं विविध अभयारण्यांकडे वळत आहेत.

हे वाचा - बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू

व्हिडिओ होतोय व्हायरल

वाघ पर्यटकांच्या जवळ येत असताना काहीजणांनी या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Tiger, Tiger attack