‘टायगर अभी जिंदा है’ ज्योतिरादित्य शिंदें अॅक्शनमध्ये; काँग्रेस नेत्यांना दिलं दबंगस्टाइल उत्तर

‘टायगर अभी जिंदा है’ ज्योतिरादित्य शिंदें अॅक्शनमध्ये; काँग्रेस नेत्यांना दिलं दबंगस्टाइल उत्तर

कॉंग्रेसच्या नेत्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसाठी देशद्रोहीसारखे शब्द वापरले होते. आज शिंदेंनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला

  • Share this:

भोपाळ, 2 जुलै :  शिवराज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा फॉर्ममध्ये दिसत आहेत. राजभवनातून बाहेर पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. कॉंग्रेसने त्यांच्यावर केलेल्या आरोपांना ज्योतिरादित्यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस नेत्यांवर पहिल्यांदा हल्ला केला आहे.

हे वाचा-रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोरोनाचा परिणाम म्हणून घेतला हा निर्णय

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी कधीही दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केलं नव्हतं. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर त्यांनी कॉंग्रेसचा जोरदार समाचार घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची भूमिका कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात  महत्त्वाची ठरली आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस नेते शिंदेंसाठी देशद्रोहीसारखे शब्द वापरतात. शिंदे म्हणाले की मी 3 महिन्यांपासून शांत आहे, पण कॉंग्रेसचे लोक माझ्या प्रतिमेला मलीन करीत आहेत.

हे वाचा-राहुल गांधी आदिवासीच्या मुलांना करणार ‘स्मार्ट'; सुरू केली नवी योजना

दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर बरसले

ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं. ते म्हणाले की, मला कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही. देशातील जनतेसमोर सत्य उघड आहे. या नेत्यांनी राज्याला कसं लुटलं ते सर्वांसमोर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईन. सध्या या दोघांना मला इतकंच सांगायचं आहे की, 'टायगर अभी जिंदा है!'

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: July 2, 2020, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading