मराठी बातम्या /बातम्या /देश /

एमपीमध्ये राष्ट्रीय प्राणी धोक्यात? जंगलात लटकलेल्या अवस्थेत वाघ आढळल्याने खळबळ

एमपीमध्ये राष्ट्रीय प्राणी धोक्यात? जंगलात लटकलेल्या अवस्थेत वाघ आढळल्याने खळबळ

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पन्ना व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृतदेह फास्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरलाही येथे एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

पन्ना, 7 डिसेंबर : देशात वाघांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे पाच बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातही पन्ना व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. क्लच वायरच्या साह्याने वाघाचा मृतदेह लटकवल्याचं दिसून आलं आहे. व्याघ्र प्रकल्पातल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत आहे. भारतात वाघ मृतावस्थेत आढळण्याचे प्रकार वाढले आहेत. चार ते पाच दिवसांपूर्वी वेगवेगळ्या घटनांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शिवनी बफर क्षेत्रात वाघाचे पाच बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर वाघाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात येणार आहे. पन्ना व्याघ्र प्रकल्पात वन विभागाचं पथक गस्त घालत असताना उत्तर भागातल्या वनमंडळाअंतर्गत येणाऱ्या विक्रमपूर बीटजवळ या वाघाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

वाचा - सीमावादावरून महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणारी 'कन्नड रक्षण वेदिके आहे तरी काय?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी 10 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी वाघीण पी-213 (63) हिचा मृत्यू झाला होता. पन्ना व्याघ्र संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या व वाढलेल्या पी-213(63) या वाघिणीचे वय तीन वर्षं होतं. गस्त घालत असलेल्या पथकाला अमानगंज बफरच्या रमपुरा बीटमध्ये वाघीण मृतावस्थेत दिसली होती. वाघिणीच्या मृत्यूची माहिती मिळताच पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपसंचालक, व्याघ्र प्रकल्पातले डॉक्टर आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन याची पाहणी केली होती. त्या अगोदर 9 जून रोजीही एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पी-111 नाव असलेल्या त्या वाघाचं वय 13 वर्षं होतं. वन विभागाच्या गस्तिपथकाला पन्ना-कटनी राज्य मार्गावर वाघाचा मृतदेह आढळला होता. मृतावस्थेत आढळलेला तो वाघ T1 वाघिणीचा बछडा होता.

मध्य प्रदेशात सर्वाधिक 526 वाघ

अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल 2018 नुसार, देशात सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात आहेत. तेथे वाघांची संख्या 526 इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या काही काळापासून तिथे वाघांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच, पन्ना आणि संजय दुबरी अशी अनेक व्याघ्र अभयारण्यं आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये बालाघाट जिल्ह्यातल्या लालबर्रा वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला होता. बछड्यांमध्ये झालेल्या संघर्षातून त्याचा मृत्यू झाला असावा, असं वनाधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मृत बछडा हा 18 वर्षांचा होता. वाघांच्या वाढत्या मृत्यूंवर सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Tiger