Home /News /national /

भावांचं प्रेम बघा! एकत्र पाणी पिताना दिसले बछडे, वाघिणीने रुबाबात काढू दिला PHOTO

भावांचं प्रेम बघा! एकत्र पाणी पिताना दिसले बछडे, वाघिणीने रुबाबात काढू दिला PHOTO

बछड्यांसह वाघिणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबई, 01 मार्च : भारतीय वन अधिकारी (आयएफएस) प्रवीण कसवान यांनी आपल्या ट्विटरवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर आपल्या तोंडातून 'वाह! काय फोटो आहे' असे उद्गार निघाल्याशिवाय राहणार नाहीत. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्यासह अनेक दिग्गजांनीही या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आयएफएस कसवान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये वाघांचं संपूर्ण कुटुंब एकत्र पाणी पित असताना आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. चार बछडे एकसारख्याच पोझिशनमध्ये बसून तलावातील पाणी पित आहेत. त्याच वेळी, जवळ उभी असलेली वाघीण ही पाहारा देत असल्याचं दिसत आहे. आपल्या बछड्यांच्या संरक्षणासाठी ती उभी असल्याचं या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे. हे वाचा-फक्त 3 दिवसांसाठी मिळालं आईचं प्रेम, प्रसूतीनंतर ठाण्यात शिक्षक महिलेचा मृत्यू वाघांचा हा व्हायरल होत असलेला फोटो पश्चिम भारतातील असल्याचं सांगितलं जात आहे. विजय गोयल यांनी हा क्लिक केला आहे. असाच आणखी एक फोटो सिंहाच्या परिवाराचा ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये छावा आणि सिंहीण तलावावर पाणी पित असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी ट्वीट केलं आहे. 'खरोखर आश्चर्यकारक'. ट्विटरवर हा फोटो साडेचार हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हे वाचा-अबब! एक-दोन नाही तर 35 मिनिटांत तिनं दिला तब्बल 6 मुलांना जन्म
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Twitter, Viral photo

    पुढील बातम्या