Home /News /national /

भारतात धोका वाढला! 3 वर्षांच्या मुलाला झाली कोरोनाची लागण

भारतात धोका वाढला! 3 वर्षांच्या मुलाला झाली कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या 40वर पोहोचली आहे.

    कोची, 09 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 80 देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असताना, भारतातही 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमधील कोची येथे एका तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळं देशात कोविड-19च्या (Covid 19) रुग्णांची संख्या आता 40वर गेली आहे. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. 7 मार्च रोजी इटलीहून हा मुलगा आपल्या पालकांसोबत दुबईला आला, त्यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा-कोरोनाची दहशत! रिपोर्ट येण्याआधीच धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यू वाचा-धक्कादायक! इटलीमध्ये एका दिवसात 'कोरोना'नं घेतला 336 जणांचा बळी कोरोनाच्या धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यू कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या 40वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मधुमेह असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचं कारण म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही परंतु सौदी अरेबीयातून हा तरुण भारतात आल्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लक्षण दिसत होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे तर या तरुणाचा मृत्यू झाला नाही ना? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र रिपोर्टनंतर याबाबत नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या