काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, तीन अतिरेकी जेरबंद!

या महामार्गावर एका ट्रकमधून शस्त्रांचासाठा येत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी या हायवेर नाकेबंदी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 04:25 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, तीन अतिरेकी जेरबंद!

श्रीनगर 12 सप्टेंबर : जम्मू आणि काश्मीरमधलं  कलम 370 हटवल्यानंतर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा दलांनी उधळून लावलाय. गेल्या महिनाभरापासून राज्यात अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उद्धवस्त झाले आहेत. कठूआ जवळच्या हायवेर सुरक्षा दलाच्या नाकाबंदीत एका ट्रकमधून तब्बल 6 ए.के. 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तर तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. त्या तिघांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाला मिळालेलं हे मोठं यश समजलं जातंय. या आधीही सुरक्षा दलाने पाकिस्तानातून घुसखोरी केलेल्या दोन अतिरेक्यांना अटक केली होती.

या महामार्गावर एका ट्रकमधून शस्त्रांचासाठा येत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी या हायवेर नाकेबंदी केली होती. एका ट्रकच्या तपासणीदरम्यान सुरक्षा दलाला संशयस्पाद हालचाली आढळून आल्यात. त्या ट्रकची कसून चौकशी केल्यानंतर त्यात अत्याधुनिक 6 ए. के.47 रायफल्स सापडल्या. तर तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आलीय.

मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्हाला हव्यात? 'असा' होणार आहे लिलाव

मंगळवारीच सोपोरमध्ये लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 8 जणांना अटक करण्यात आली होती. राज्यात घातपाताची मोठी घटना घडविण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIही प्रयत्नशील असून अतिरेक्यांना पूर्ण मदत त्यांच्याकडून मिळत असते. हिवाळ्याच्या आधी अतिरेक्यांची घुसखोरी करण्याचेही पाकिस्तानाचे प्रयत्न आहेत.

Loading...

काश्मीर भारताचा असल्याचं पाकच्या मंत्र्यांनी केलं मान्य

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारताने अनेक वेळा सांगितले. जगातील सर्व देशांनी देखील हे मान्य केले आहे. असे असताना पाकिस्तान मात्र काश्मीरचा उल्लेक भारत व्याप्त काश्मीर असा करत होता. पण अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे मान्य केले.

चांद्रयान - 2: लँडरला जिवंत करण्यासाठी NASAचे जबरदस्त प्रयत्न, असा पाठवला मेसेज!

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी(Shah Mehmood Qureshi) यांनी संयुक्त राष्ट्रात (United Nations) बोलताना काश्मीर (Kashmir)हा भारताचा अंतर्गत भाग असल्याचे म्हटले. काश्मीर संदर्भात बोलताना कुरैशी म्हणाले इंडियन स्टेट जम्मू-काश्मीर (Indian State Jammu-Kashmir) याचाच अर्थ भारतातील राज्य जम्मू-काश्मीर असा होय. कुरैशी यांच्या या वक्तव्यामुळे जे सत्य जगाने मान्य केले आहे. पण पाकिस्तान नेहमी फेटाळत होता तो देखील त्यांनी मान्य केला आहे.

चूक लक्षात आल्यानंतर केले आरोप

काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे सांगितल्यानंतर कुरैशी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भारताला वर्तमान सीमा बदलायच्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...