जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, 3 दिवसात 11 जणांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, 3 दिवसात 11 जणांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत (Shopian Encounter) तीन दहशतवाद्यांचा ((Terrorist Killed in Encounter) खात्मा झाला आहे.

  • Share this:

श्रीनगर 11 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत (Shopian Encounter) तीन दहशतवाद्यांचा ((Terrorist Killed in Encounter) खात्मा झाला आहे. पोलिसांनी याबद्दलची माहिती देत सांगितलं, की शोपियानमधील हे ऑपरेश यासोबतचं संपलं आहे. तर, दुसरीकडे अनंतनागच्या बिजबेहरामध्येही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. तिथे अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपलेले असल्याचं म्हटलं जात आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की शोपियान जिल्ह्यातील हादीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केली. यानंतर सुरक्षा दलाकडूनही या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आलं.

13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद; उद्याच उरकून घ्या बँकेतील महत्त्वाची कामं

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात आणखी एक चकमक सुरू आहे. त्यांनी सांगितलं, की दक्षिण काश्मीरच्या या जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील सेमथानमध्ये दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलानं घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यानंतर याठिकाणी चकमक सुरू झाली. याबाबतचं विस्तृत वृत्त अद्याप समोर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

"संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती गरजेची", संजय राऊतांचा धमाका

याआधी सुरक्षा दलानं शुक्रवारी शोपियान जिल्ह्यात एका मस्जिदमध्ये लपलेल्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. तर, गुरुवारी शोपियानच्याच जनमोहल्ला परिसरात चकमकीदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले होते. मस्जिदमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना आधी सरेंडर करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. अशात अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सुरक्षा दलानं याठिकाणी पाच दहशतवाद्यांना ठार केलं

Published by: Kiran Pharate
First published: April 11, 2021, 8:17 AM IST

ताज्या बातम्या