मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबईतील तीन तरुण गंगा नदीत गेले वाहून, अंदाज चुकल्याने गमावला जीव

मुंबईतील तीन तरुण गंगा नदीत गेले वाहून, अंदाज चुकल्याने गमावला जीव

हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगा नदीत (Ganga river) पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांपैकी तीनजण (3 friends) नदीत वाहून गेले आहेत.

हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगा नदीत (Ganga river) पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांपैकी तीनजण (3 friends) नदीत वाहून गेले आहेत.

हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगा नदीत (Ganga river) पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांपैकी तीनजण (3 friends) नदीत वाहून गेले आहेत.

  • Published by:  desk news

हरिद्वार, 5 ऑगस्ट : हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगा नदीत (Ganga river) पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांपैकी तीनजण (3 friends) नदीत वाहून गेले आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या इतरांनी याची माहिती स्थानिक प्रशासनानाला दिल्यानंतर शोधकार्य (Search operation) सुरु करण्यात आलं, मात्र आता 24 तास उलटूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

अशी घडली घटना

मुंबईतील 5 मित्रमैत्रिणींचा समूह फिरायला हरिद्वारला गेला होता. हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये हे सर्वजण उतरले होते. हॉटेलपासून जवळच असलेल्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर ते पोहण्यासाठी गेले. त्यावेळी त्यातील एक तरुण आणि दोन तरुणी खोल पाण्यात उतरल्या. पाण्यात उतरलेले इतर सर्वजण जेव्हा काठावर आले, तेव्हा आपल्यापैकी तिघे बाहेर आले नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

अधिक खोल पाण्यात डुबकी मारण्याच्या हेतूने ते खोलवर गेले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना किनाऱ्यावर येता आले नाही. वाहून जाणाऱ्या तरुणांपैकी एकाने मोठमोठ्याने हाका मारून मित्रांना बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इतक्या आतमध्ये होता की कुणीही त्याच्या मदतीला जाऊ शकले नाही.

हॉटेलवर धाव

ही घटना घडताच त्याच्या मित्राने हॉटेलवर धाव घेत व्यवस्थापनाला याची कल्पना दिली. व्यवस्थापनाने स्थानिक पोलिसांना कळवले आणि या तरुणांचा शोध सुरु करण्यात आला. बुधवारी रात्रीपर्यंत शोधकार्य सुरु होते. मात्र अंधार पडल्यामुळे काम थांबवण्यात आले.

हे वाचा -थरकाप उडवणारा VIDEO!श्वेता तिवारीच्या मुलीने शेयर केला डेब्यू फिल्मचा दुसरा टीजर

पाच मित्र मैत्रिणींपैकी तिघे वाहून गेल्यामुळे उरलेल्या दोघांना धक्का बसला आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोन तरुणी या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या, तर एकजण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता.

पावसाळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांपैकी अनेकांचे अपघात होत असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. नागरिकांनी खोल पाण्यात उतरू नये आणि पोहता येत नसेल, तर जलाशयापासून दूर राहावं, असा सल्ला देण्यात येत आहे.

First published:

Tags: Ganga river, Uttarakhand