Home /News /national /

दुर्दैवी..! एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

दुर्दैवी..! एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

Representative Image

Representative Image

भरतपूरच्या कांदौली गावातही एक अशीच दुःखद घटना घडली आहे. येथील एका घरातील तीन लहान मुलींचा कारमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला. या तीन लहानग्या मुली आपापल्या आईसोबत तेथील सत्संगमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.

    भरतपूर, 15 एप्रिल: (Bharatpur Rajasthan) खेळता-खेळता झालेली छोटीशी चूक लहान मुलांना भोवल्याच्या आणि अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. भरतपूरच्या कांदौली गावातही एक अशीच दुःखद घटना घडली आहे. येथील एका घरातील तीन लहान मुलींचा कारमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला. या तीन लहानग्या मुली आपापल्या आईसोबत तेथील सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याने लोकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्या तिघींच्याही आई सत्संग ऐकण्यासाठी गेल्या असताना या तीनही मुली खेळता-खेळता तेथे उभ्या असलेल्या एका कारमध्ये चढल्या. अचानक त्या कारचा दरवाजा बंद झाल्यानंतर तिन्ही मुलींचा श्वास गुदमरू लागला. यानंतर त्यांनी आरडाओरडा केला तरी तेथे सुरू असलेल्या सत्संगामुळे त्यांचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. जेव्हा त्यांच्या आईंनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली तेव्हा त्या कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या त्यांना ताबडतोब तेथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हेही वाचा -  IPL 2021, DC Vs RR: दोन नवखे कर्णधार आमने-सामने, कोरोनामुळे दिल्लीचे 3 मुख्य खेळाडू सामन्याबाहेर या तीन लहान मुलींमध्ये रामबाबू यांची सहा वर्षीय मुलगी हिना, लक्ष्मण यांची साडेपाच वर्षीय मुलगी वैष्णवी आणि कैलाश यांची पाच वर्षीय मुलगी पीहू यांचा समावेश आहे. या तीन मुलींच्या माता सत्संग ऐकत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मुली बाहेरील बाजूस खेळत होत्या. या तिघी चिमुकल्या मुली खेळता-खेळता तेथे उभ्या असलेल्या एका कारमध्ये चढल्या. मात्र कारचा दरवाजाला ऑटोमॅटिक लॉक लागले आणि या तीनही दुर्दैवी मुली आत अडकल्या. कारचा दरवाजा बंद झाल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. तसेच, सत्संगाच्या आवाजामुळे या चिमुकल्यांच्या किंकाळ्यांकडेही कोणाचे लक्ष जाऊ शकले नाही. या मुलींना बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रूपवास गावातील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तोवर दुर्दैवाने या तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रूपवास येथील ठाणे अधिकारी भोजराम जाब्ता यांनी घटनास्थळी पोहोचून या दुःखद प्रसंगाची माहिती घेतली. यानंतर तीनही मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. न कळत्या वयातील तीन मुलींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, India, Rajasthan, Road accident, Shocking accident

    पुढील बातम्या