Home /News /national /

माणुसकीचं सुखद दर्शन, स्मशानात ढिगाऱ्याखाली माणसं दबून मरत असतानाच ते तिघे आले देवदूत बनून...

माणुसकीचं सुखद दर्शन, स्मशानात ढिगाऱ्याखाली माणसं दबून मरत असतानाच ते तिघे आले देवदूत बनून...

एरवी जातीपातीत विभागला गेलेला आणि धार्मिक भिंती बांधणारा समाज एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत मात्र खूप समंजसपणे वागताना दिसतो. अशीच घटना गाझियाबादमध्ये घडली आहे.

  गाझियाबाद, 4 जानेवारी : जिथं मृत माणसांना (dead) शेवटचा निरोप द्यायला जिवंत माणसं जमतात ती जागा म्हणजे स्मशान (crematorium). मात्र या स्मशानातच जिवंत माणसांना मृत्यूनं गाठल्याची नाट्यमय आणि दुर्दैवी घटना घडली गाझियाबादमध्ये (Ghaziabad). काल दिल्लीजवळच्या या शहराच्या मुरादनगर भागात स्मशानाचं छत कोसळून (roof collapse) झालेल्या झालेल्या दुर्घटनेत (accident) तब्बल 25 लोक ठार झाले. मात्र दुर्घटनेच्या कठीण काळातही अनेक सामान्य लोक सगळा भेदभाव विसरत ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा जीव वाचवायला समोर आले. त्यातही तीन जण जणू खरोखर देवदूत बनले. समीर, शादाब आणि तनवीर अशी या तिघांची नावं. समीर
  समीर
  या तिघांनी आपल्या जीवाची पर्वा न करता झोकून देत चौघांना जिवंत बाहेर काढलं. समीर आणि तनवीर म्हणतात, की आम्ही तसे सगळ्यांसारखेच सामान्य आहोत मात्र काय जाणे कशी आम्हाला त्या उपरवाल्यानं वेगळीच हिंमत दिली. आम्ही धडाडीनं हातोडा चालवत राहिलो. आमच्या आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती ढिगारा हटवण्यात जीव लावून मग्न होता. पोलीस-प्रशासन दाखल होण्याआधी सामान्यच सामान्यांना वाचवायला धडपडत होते. शादाब
  शादाब
  बंबा रोड स्मशानाजवळ चर्च कॉलनीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद समीरनं सांगितलं, की तो स्मशानाजवळ काहीतरी काम करत होता. एकदम छत कोसळल्याचा मोठा आवाज झाला तसा तो तिकडं पळाला. खूप लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळत होतं. त्यानं आरडाओरडा करत इतरही अनेकांना गोळा केलं आणि लगोलग हातोडा आणि इतर हत्यारं घेऊन लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपडू लागला. मोहम्मद तन्वीर आणि शादाबही तिथं आले. हळूहळू बरेच लोक जमले. समीर सांगतो, की इतर लोक येण्याच्या आधीच या तिघांनी चार जिवंत लोकांना सुखरूप बाहेर काढलं होता. अनेक मृतदेहही त्यांनी न डगमगता उपसून काढले. मोहम्मद म्हणाला, की आधी मी भांबावूनच गेलो होतो मात्र देवानं धाडस दिलं आणि लागलो कामाला! सांडलेलं रक्त पाहून मन थरथर कापत होतं, डोळे भरून येत होते. पण जिवंत असलेल्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचवायचंच हा निश्चय केला. पोलीस येईपर्यंत तिघांसह इतर लोकांनी जवळपास 12 लोकांना बाहेर काढलं. पोलिसही पुढच्या 15 मिनिटात पोचले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Delhi, Police

  पुढील बातम्या