दाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला!

दाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला!

अटक करण्यात आलेले तीघेही दाऊद टोळीचे सदस्य असून दाऊदच्या इशाऱ्यावर ते काम करत होते. त्यातला एक जण अफगाणिस्तानचा नागरिक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 20 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाला आता फक्त सहा दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर सुरक्षा दल सतर्क झाले असून सुरक्षा दलाने एका धक्कादायक कटाचा पर्दाफाश केलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या तीन  गुंडांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दिल्लीतून तीन गुंडांना अटक केलीय. हे तीघेही दाऊद टोळीचे सदस्य असून दाऊदच्या इशाऱ्यावर ते काम करत होते. त्यातला एक जण अफगाणिस्तानचा नागरिक आहे. वली सैफी (अफगाणिस्तान), शेख रियाजुद्दीन (ओडिशा) आणि मुस्तसिम तस्लिम (केरळ) या तीन गुंडांना पोलिसांनी अटक केलीय. हे तीघेही दाऊदचे हस्तक आहेत.

दाऊद पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या मदतीने हा कट रचत होता. या तीघांकडून दोन पिस्तुलं आणि 6 जिवंत काडतुसं आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटकमधल्या संघ नेत्यांच्या हत्या घडवून आणण्यासाठी त्यांना दोन कोटी रुपयेही देण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

सैफी हा अफगाणिस्तानातून भारतात कसा आला याचीही चौकशी करण्यात येत आहे. दाऊद इब्राहीम हा कराचीत पाकिस्तान लष्कराच्या सुरक्षा घेऱ्यात राहातो अशी भारतीय सुरक्षा दलाची माहिती आहे. ISI दाऊदा पैसा आणि इतर गोष्टी पुरवत असते. भारतात दाऊदच्या गुंडांचं आजही मोठं जाळं आहे.

मुंबईत त्याचे काही साथीदार बांधकाम आणि इतर काही व्यवसायात असून मोठ्या प्रमाणावर ते काळा पैसा दाऊदच्या कामासाठी वापरत असतात. तर दुबई आणि इतर आखाती  आणि आफ्रिकी देशांमध्येही दाऊदचा व्यवसाय असून तिथूनही त्याला प्रचंड प्रमाणात पैसा पुरवला जातो.

भारतात घातपाती कारवाया करणं आणि समाजात फुट पाडण्याचे त्याचे उद्योग अजुनही सुरू असतात. प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुरक्षा दलाने व्यापक मोहिम राबली होती त्यात हे गुंड सापल्याने घातपाताचा मोठा डाव उधळला गेल आहे.

Special Report : लग्नाची डेडलाईन ठरली डेथलाईन

First published: January 20, 2019, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading