Home /News /national /

मित्रांनी केला मित्राचा घात, मदतीसाठी पाठवले आणि होणाऱ्या वहिणीवर केला गँगरेप!

मित्रांनी केला मित्राचा घात, मदतीसाठी पाठवले आणि होणाऱ्या वहिणीवर केला गँगरेप!

. वाटेत रेल्वेमध्ये जागेवरून तिचा काही लोकांसोबत वाद झाला. त्यानंतर तिने आपल्या होणाऱ्या पतीला फोन करून याची माहिती दिली

    बुलंदशहर, 22 फेब्रुवारी :  उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये होणाऱ्या पतीच्या 3 मित्रांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तिन्ही आरोपी या रेल्वेमध्ये पीडित तरुणीला मदत करण्यासाठी गेले होते. पण, परत येताना या तिन्ही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुलंदशहर जनपद येथील ककोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पीडित तरुणी ही जनपद येथील अरनिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी आहे. ही तरुणी बुधवारी रेल्वेने अरनिया येथून गाजियाबादला जात होती. वाटेत रेल्वेमध्ये जागेवरून तिचा काही लोकांसोबत वाद झाला. त्यानंतर तिने आपल्या होणाऱ्या पतीला फोन करून याची माहिती दिली. पण पतीला तिथे येणे शक्य नव्हतं. त्याने मग जवळच असलेल्या आपल्या तीन मित्रांना बैर स्टेशनवर पाठवलं. या तिन्ही तरुणांनी रेल्वेमध्ये चढून वाद मिटवला. त्यानंतर ही तरुणी याच तरुणांसोबत दुचाकीवरून निघाली होती. परंतु, वाटेमध्ये या तिन्ही नराधमांनी एकटी असल्याचा फायदा घेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरानंतर तिने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर बुलंदशहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दोन फरार झाले आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. माहेरी जाण्यापासून रोखले, संतापलेल्या पत्नीने ब्लेडने कापले नवऱ्याचे प्राईव्हट पार्ट! दरम्यान, झारखंडमधील गिरिजीड जिल्ह्यात एका पत्नीने रागाच्या भरात आपल्या नवऱ्याच्या प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडमधील गिरिजीड जिल्यातील विष्णुगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पती आणि पत्नी वादाची भयावह घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पत्नीने नवऱ्याचे प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केले. ब्लेडने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पतीला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. डॉक्टर आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या प्राईव्हट पार्टच्या 60 टक्के भाग कापला गेला आहे. पत्नीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पतीने सांगितलं की, 'माझी पत्नीही माझ्यासोबत राहण्यास इच्छूक नाही. दोनच दिवसांपूर्वी ती माहेरावरून परत आली होती. पण पुन्हा तिने माहेरी जाण्यासाठी हट्ट धरला होता. माहेरी जाण्यावरूनच आमच्यामध्ये वाद झाला.' हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये मारामारी झाली. रागाच्या भरात पत्नीने ब्लेड घेतली आणि नवऱ्याच्या प्राईव्हट पार्टवर सपासप वार केले. ब्लेडने वार केल्यानंतर पती रक्तबंबाळ झाला आणि जागेवरच कोसळला.  तर त्याच्या पत्नीला याबद्दल विचारले असता तिने सांगितलं की, 'मला परिक्षेसाठी माहेरी जायचं होतं. पण त्याने नकार दिला होता. त्यामुळे आमच्यात भांडण झालं.' सासरच्या आणि माहेरच्या मंडळीचे मौन या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, 'जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याने आपल्या जबाबामध्ये पत्नीने प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केल्याचं सांगितलं आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला रिम्समध्ये हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.'या घटनेची माहिती मिळताच बगोदरच्या रुग्णालयात लोकांची एकच गर्दी जमा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या दाम्पत्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात हे कृत्य केलं. जखमी पतीची प्रकृती स्थिर आहे. परंतु, या प्रकरणावर महिलेकडील आणि सासरच्या मंडळींनी काही बोलण्यास नकार दिला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Crime, Rape, UP, Uttarpradesh

    पुढील बातम्या