मराठी बातम्या /बातम्या /देश /

अरेरे! डोळ्यांसमोर नदीत वाहून गेला मित्र, मदतीसाठी पाण्यात उतरलेल्या तिघांचा मृत्यू

अरेरे! डोळ्यांसमोर नदीत वाहून गेला मित्र, मदतीसाठी पाण्यात उतरलेल्या तिघांचा मृत्यू

पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि खोलीही जास्त होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे नदीत उतरलेल्या तिघांचा मृत्यू झाला.

  • Published by:  Ajay Kautikwar
फारुखाबाद 20 जुलै: सोमवती अमावस्येनिमित्त (somwati amavasya) गंगा घाटावर (Ganga River) स्नान करण्यासाठी गेलेल्या चार मित्रांच्या आज जीवावर बेतली. अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान पवित्र समजलं जातं. ते चारही मित्र घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. त्यातला एक मित्र सर्वांच्या आधी नदीमध्ये उतरला. कुठलाही अंदाज न घेता तो खोल पाण्यात जात होता. त्याला वाचविण्यासाठी इतर तीन मित्रही पाण्यात गेले आणि तेही बुडाले. यातल्या तीन जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर एकाला वाचविण्यात यश आलं. नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी गर्दी होती. त्यात हे मित्र स्नानासाठी पोहोचले. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि खोलीही जास्त होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. आपली जीवलग मित्र वाहत असल्याचं दिसताच ते तीनही मित्र नदीच्या पाण्यात उतरले. मात्र सगळेच पाहण्यात वाहत गेले. तोपर्यंत काठावर एकच गोंधळ उडाला. तिथे उपस्थित असलेल्या काही मच्छिमारांनी त्यातल्या एकाला वाचवण्यात यश मिळवलं. तर इतर तिघांचे मृतदेह मात्र सापडले नाही. शेवटी अनेक तासांच्या बचाव कार्यानंतर त्या तिघांचेही मृतदेह मिळाले आहेत. सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी नदीच्या गर्दी केली होती. कोरोनामुळे लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं होतं मात्र त्याचं पालन लोकांनी केलं नाही. ‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने लाँच केलं औषध, किंमतही आहे कमी या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाविकांना घाट सोडण्यासाठी विनंती केली. त्यानंतर घाटावरची गर्दी कमी झाली. मुसळधार पावसामुळे अचानक फळ बाजारावर कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO पावसाळ्याचे दिवस आणि सणांमुळे नदीवर भाविकांचा ओघ जास्त असतो. त्यामुळे प्रशासनासमोरचं आव्हान वाढलेलं आहे. भाविकांना रोखण्यासाठी आता सर्व मार्गांवर अडथळे उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
First published:

Tags: Uttar pradesh

पुढील बातम्या