मराठी बातम्या /बातम्या /देश /

दुःखद! कामासाठी बाहेर गेली होती महिला, परत आल्यावर दिसले टाकीत पडलेल्या मुलांचे मृतदेह

दुःखद! कामासाठी बाहेर गेली होती महिला, परत आल्यावर दिसले टाकीत पडलेल्या मुलांचे मृतदेह

कामानिमित्त बाहेर गेलेली महिला (Three children died due to sinking in the water tank) जेव्हा घरी परत आली, तेव्हा आपल्या तिन्ही मुलांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचं तिला दिसलं.

  • Published by:  desk news

भिलवाडा, 27 ऑक्टोबर : कामानिमित्त बाहेर गेलेली महिला (Three children died due to sinking in the water tank) जेव्हा घरी परत आली, तेव्हा आपल्या तिन्ही मुलांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचं तिला दिसलं. मोलमजुरीचं काम करून चरितार्थ चालवणाऱ्या कुटुंबाला तीन मुलं होती. वडील आणि आई (Parents were out of home) दोघंही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी खेळता खेळता मुलं घराबाहेर (Fell into water tank) असलेल्या पाण्याच्या टाकीकडं गेली. टाकीत पडून त्यांचा मृत्यू झाला.

अशी घडली दुर्घटना

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील बदनोरमध्ये महेंद्र सिंग रावत हे पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत होते. महेंद्र हे मोलमजुरीचं काम करत असल्यामुळे त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. घटनेच्या वेळी मजुरीच्या कामासाठी गुजरातला गेले होते. गावात त्यांची पत्नी आणि तीन मुलं होती. महेंद्र यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्याचवेळी घरात खेळणारी मुलं घराबाहेर आली आणि पाण्याच्या टाकीकडे गेली.

हे वाचा- तिच्यातील अन्नपूर्णेमुळं घरात आली लक्ष्मी! छोले-कुलचे विकून मिळवलं गमावलेलं वैभव

टाकीत पडून मृत्यू

घराबाहेर पाणी भरून ठेवलेली टाकी 10 फूट खोल होती. खेळता खेळता तिन्ही मुलं या टाकीत पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत 6 वर्षांची सीमा, 4 वर्षांचा नरेंद्र आणि 2 वर्षांचा पंकज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाहेरून घरी आल्यावर टाकीत आपल्या तिन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना पाहन त्यांच्या आईवर आभाळ कोसळलं. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

First published:

Tags: Death, Rajsthan