• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दुःखद! माती आणायला गेलेले चिमुकले पडले खड्ड्यात, तिघांचा बुडून मृत्यू

दुःखद! माती आणायला गेलेले चिमुकले पडले खड्ड्यात, तिघांचा बुडून मृत्यू

खेळण्यासाठी माती आणायला गेलेल्या तीन (Three children died due to drowning into water) मुलांना पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  पटना, 17 ऑक्टोबर : खेळण्यासाठी माती आणायला गेलेल्या तीन (Three children died due to drowning into water) मुलांना पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. गावात पाऊस पडून गेल्यानंतर खेळण्यासाठी ओली माती आणायला (Children were collecting sand) ही मुलं गेली होती. मात्र तिथेच असणाऱ्या एका भल्यामोठ्या खड्ड्याची त्यांना कल्पनाच आली नाही. तोल जाऊन या खड्ड्यात पडल्यामुळे तीन मुलांचा मृत्यू झाला. अशी घडली घटना बिहारच्या मधुबनी जिल्ह्यतील बेनीपट्टी यभागात राहणारी तीन मुलं ओली माती भरून आणण्यासाठी गेली होती. तिथे एक मोठा खड्डा होता आणि त्यात पाणी भरलं होतं. मात्र सगळीकडे चिखल असल्यामुळे मुलांना तो खड्डा दिसला नाही. माती भरता भरता एक मुलगा त्यात पडला. खड्डा खोल असल्यामुळे तो त्यात बुडू लागला. ते पाहून इतर तिघे त्याला वाचवण्यासाठी खड्ड्यात उतरले आणि तेदेखील बुडू लागले. खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी संघर्ष मुलांच्या उंचीच्या मानाने हा खड्डा फारच खोल असल्यामुळे मुलांच्या नाकातोंडात पाखड्ड्यातून बाहेर पडण्याच्या झटापटीत एक मुलगा यशस्वी झाला आणि कसाबसा तो खड्ड्यातून बाहेर आला. बाहेर येताच त्याने आरडाओरडा करत शेजारपाजारच्या माणसांना हाका मारल्या. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूची माणसं धावत आली आणि त्यांनी मुलांना खड्ड्यातून बाहेर काढलं. तिघांचा मृत्यू खड्ड्यातून मुलांना बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेत दोन मुलींचा तर एका मुलाचा मृत्यू झाला. प्रियंका कुमारी (14 वर्षं), मनिषा कुमारी (10 वर्षं) आणि सचिन कुमार (9 वर्षं) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. हे वाचा- काश्मीर : अज्ञात हल्लेखोरांचा बिहारी कामगारांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू गावावर शोककळा ही बातमी समजल्यानंतर मुलांच्या आईवडिलांवर शोककळा पसरली. सर्वांनी एकच हंबरडा फोडत आपलं दुःख व्यक्त केलं. संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेमुळं शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: