मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona Virus ची तिसरी लाट उंबरठ्यावर, फेब्रुवारीमध्ये दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर?

Corona Virus ची तिसरी लाट उंबरठ्यावर, फेब्रुवारीमध्ये दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर?

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)  ओमायक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 05 डिसेंबर: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर आता तिसरी लाट (Third Wave) येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की, देशात कोविड-19 ची तिसरी लाट जानेवारी 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधील डेटाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी सांगितलं की, ओमायक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा दुप्पट वेगानं पसरतो, त्यामुळे निर्बंध लागू करुन नव्या प्रकरणांची संख्या कमी केली जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) Omicron ला चिंताजनक व्हेरिएंट म्हणून वर्गीकृत केलं आहे. हेही वाचा-  महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून विशेष गाड्या, असं असेल वेळापत्रक दैनिक भास्कर वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर अग्रवाल यांनी असंही सांगितलं की, फेब्रुवारीपर्यंत हा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. या काळात दररोज संसर्गाची प्रकरणे 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकतात. त्यांनी दावा केला की, ओमायक्रॉन व्हेरिएंट काही महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत आला होता. मात्र त्याचा संसर्ग हळूहळू होत होता. त्यांनी सांगितलं, यामागील कारण म्हणजे तेथील 80 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये कोविड विरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. म्हणजेच हे लोक कोविड-19 ची लागण झाल्यापासून बरे झालेत. लॉकडाऊनऐवजी खबरदारी वाढवण्याची गरज - प्रा. अग्रवाल कोविडच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, भारतातही लोकांना पुन्हा संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली. ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून पुन्हा संसर्ग होण्याच्या धोक्यांबाबत ते म्हणाले, आतापर्यंत फक्त एक अभ्यास आला आहे. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण 3 पटीनं वाढलं आहे. जरी त्याचे आकडे खूप कमी आहेत. दक्षिण आफ्रिकेत संसर्ग झालेल्या लोकांपैकी फक्त 1 टक्के लोकांना पुन्हा संसर्ग झाला. आमच्या अभ्यासानुसार, ओमायक्रॉन नैसर्गिक प्रतिकारशक्तीला अधिक बायपास करते असे दिसते, मात्र त्याचाही वाईट परिणाम झालेला नाही. हेही वाचा- रोहित शर्माला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याची तयारी! वाचा BCCI चा खास प्लॅन भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात याविषयी प्राध्यापक अग्रवाल म्हणाले की, कडक लॉकडाऊनऐवजी सावधगिरी वाढवण्याची गरज आहे. ते म्हणाले, जास्त गर्दीच्या भागात लॉकडाऊन. सरकारनं निर्बंध लादले पाहिजेत आणि कडक लॉकडाऊन टाळावं.
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या