'लंडनला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानांना उडू देणार नाही', धमकीच्या फोनने खळबळ

'लंडनला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानांना उडू देणार नाही', धमकीच्या फोनने खळबळ

ही धमकी नेमकी कुणी दिली आणि त्याचा काय उद्देश होता याचा माग काढण्याचं काम सुरक्षा यंत्रणा करत असून खास खबरदारीही घेण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 04 नोव्हेंबर: राजधानी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport)  धमकीचा फोन आल्याने विमानतळ प्रशासन हादरून गेलं आहे. खालिस्तान समर्थक ‘शिख फॉर जस्टिस’ (Sikhs for Justice) या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे. दिल्ली विमानतळावर या संघटनेकडून धमकीचा फोन आल्याची माहिती विमाननतळ सुरक्षा विभागाचे DCP राजीव रंजन यांनी दिली. एअर इंडिया (Air India)च्या लंडनला जाणाऱ्या दोन विमानांचं उड्डाण होऊ दिलं जाणार नाही अशी धमकी मिळाली आहे.

दिल्लीतल्या विमानतळावरून गुरुवारी लंडनला जाणाऱ्या दोन विमानांचं उड्डाण आम्ही रोखणार आहोत असं धमकी देणाऱ्याने सांगितलं. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षा विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.

Sikhs for Justice ही अमेरिकेतली संघटना असून पंजाबमधल्या फुटिरतावादी चळवळींना पाठिंबा देण्याचं काम ही संघटना करत असते. पाकिस्तान या संघटनेला आर्थिक मदत करतो असाही आरोप होत असतो. या आधी केंद्र सरकारने या संघटनेशी संबंधित 12 वेबसाईट्सवर बंदी घातली होती.

EVM नाही तर MVM म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशिन’, राहुल गांधीची PMवर टीका

जगभरात राहणाऱ्या शिख बांधवांना भडकविण्याचं कामही संस्था करत असते. भारतात या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांमधून या संघटनेचे लोक जगभर दुष्प्रचार करण्याचं काम करत असतात.

या धमकीमुळे दिल्ली विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या विमानतळावर सतत महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची ये-जा असल्याने खास खबरदारी घेण्यात येत असते. या संघटनेचे कारनामे या आधीही उघड झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्याबद्दल कायम सतर्क असतात.

मंदिरात नमाज पठणानंतर आता भाजपच्या नेत्याने वाचली मशिदीत हनुमान चालीसा

ही धमकी नेमकी कुणी दिली आणि त्याचा काय उद्देश होता याचा माग काढण्याचं काम सुरक्षा यंत्रणा करत असून खास खबरदारीही घेण्यात येत आहे. सरकारने या आधीच सर्व विमानतळांवर अपहरण विरोधी यंत्रणा तयार केली आहे. खास कमांडोंना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांना कायम सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 6:41 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या