Home /News /national /

नितीन गडकरींची नवी योजना; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत करणार मोठा बदल

नितीन गडकरींची नवी योजना; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत करणार मोठा बदल

येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी मोठा बदल करण्यात येणार आहे

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : देशात वाढत्या प्रदूषणामागे वाढणाऱ्या गाड्याची संख्याही कारणीभूत आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करणे आवश्यक आहे. परिणामी नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतील. सार्वजनिक वाहतुकी (Public Transport) च्या वाढत्या महासाथीच्या दरम्यान नितीन गडकरी (Nitin Gadhkari) नी सांगितले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये अधिकतर CNG, इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सहभागी केल्याने प्रदूषण कमी करता येऊ शकतं. ज्यामुळे इंधनामध्येही बचत होईल. गडकरी म्हणाले की, यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चात बचत करता येईल. त्यांनी रिन्यूबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापरावर (Renewable Energy and Use of Electric Car must Increased) जोर दिला. गडकरी यांनी सांगितले की अशा वाहनांच्या वापरामुळे कच्च्या तेलाच्या आयातीतही घट होईल. हे वाचा-Unlock - 4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय नितीन गडकरींनी सांगितले की नागपूरमध्ये 450 बसेसना बायोफ्लूयमध्ये बदलण्यात आलं आहे. आतापर्यंत 90 बसेस बायोफ्यूलमध्ये बदलण्यात आली आहे. बसेसमध्ये इंधनाचा वापर केल्यामुळे वर्षाला तब्बल 60 कोटी रुपयांची गरज असते. मात्र अशा बसेस CNG मध्ये बदलता येऊ शकते. सोबतचं सांगितले की सीवेजच्या पाण्यातून सीएनजी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढे गडकरी म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी लंडन बस मॉडेल (London Bus Model) चा अवलंब करण्याची गरज आहे. सोबतचे त्यांनी बस चालकांना डबल डेकर बस चालविण्याचा सल्ला दिला. गडकरींचा विश्वास आहे की अशा बसेसमध्ये आधुनिक सुविधांचा अंतर्भाव केल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या