'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'

'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'

'महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा दहशतवादीच होता.'

  • Share this:

नवी दिल्ली 18 एप्रिल : मालेगाव बॉम्ब स्फोटातल्या आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेलं वादळ शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. माध्यमांमध्येही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी यावर टीकेची झोड उठवलीय तर भाजपने जोरदार समर्थन केलंय. झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांना प्रज्ञा यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद खासदार राकेश सिन्हा यांनी केला. न्यूज18 इंडियाच्या आर पार या कार्यक्रमात या विषयावर आज वादळी चर्चा झाली.

साध्वीवर टीकेचा नैतिक अधिकार नाही

सिन्हा म्हणाले, मुंबईतल्या 1993 च्या बॉम्ब स्फोटातला आरोपी याकुब मेमन याला फाशी देण्याआधी पहाटे सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणारे आज साध्वी प्रज्ञा यांना दहशतवादी म्हणत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंग यांना दोषी ठरवलेलं नसलं तरी नैतिकतेचा प्रश्न असतो. आज शेकडो मुस्लिम तरुण आरोप नसतानाही जेलमध्ये खितपत पडलेले आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्यासारखेच आरोप असलेल्या कुणाला काँग्रेस किंवा इतर कुणी तिकीट दिलं असतं तर भाजपने केवढी टीका केली असती अशी टीका वकील फारुख खान यांनी केला.भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध पुरावे नाहीत असं म्हटलं आहे. असं असतानाही त्यांच्यावर आरोप करणं योग्य नाही. युपीए सरकारने जाणीवपूर्वक हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला असा आरोपही त्यांनी केला. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र समझौता एक्सप्रेसच्या घटनेसाठी पाकिस्तानला जबाबदार धरत असताना काँग्रेस सरकारने मात्र हिंदू साधू साध्वींना अडकवलं असा आरोपही सिन्हा यांनी केला.काँग्रेसचं कारस्थान

तर सिन्हा म्हणाले, युपीएच्या काळात गृहमंत्रालयात असणारे अधिकारी आर.व्ही. एस. मणी यांनी Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs 2006-2010 हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी गृहमंत्रालयात हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करण्याची कशी योजन बनवली गेली त्याची माहिती दिली आहे. केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठीच साध्वींना जेलमध्ये डांबण्यात आलं असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.तर साध्वींना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय असं का असा सवाल वकील मेहमूद पाशा यांनी केला. मुस्लिम, दलित, शीख समुदायाचे अनेक तरुण आज देशातल्या विविध जेलमध्ये बंद आहेत त्यांना सरकार सोडेल का असा सवालही पाशा यांनी केला.गोडसे दहशतवादीच

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका तरुणाने संघ विचारवंत आणि खासदार राकेश सिन्हा यांना प्रश्न विचारला की महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा दहशतवादी होता की नाही? त्यावर उत्तर देताना सिन्हा म्हणाले की गोडसे हा दहशतवादीच होता यावर वाद नाही. त्याचं मी नावही घेऊ इच्छित नाही असंही ते म्हणाले. भाजपच्या एखाद्या नेत्याने पहिल्यांदाच गोडसे हा दहशतवादी असल्याचं मान्य केलं त्यामुळे त्यांच चर्चेत सहभागी झालेल्या फारुक खान यांनी अभिनंदन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या