मराठी बातम्या /बातम्या /देश /

Bipin Rawat Helicopter Crash: 'ती' शेवटची 7 मिनिटं, ज्यांनी बिपीन रावत यांचा घेतला जीव

Bipin Rawat Helicopter Crash: 'ती' शेवटची 7 मिनिटं, ज्यांनी बिपीन रावत यांचा घेतला जीव

MI-17 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते 12:15 वाजता लँड होणार होतं, मात्र लँडिंगच्या सात मिनिटांपूर्वी त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

MI-17 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते 12:15 वाजता लँड होणार होतं, मात्र लँडिंगच्या सात मिनिटांपूर्वी त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

MI-17 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते 12:15 वाजता लँड होणार होतं, मात्र लँडिंगच्या सात मिनिटांपूर्वी त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: तामिळनाडूतील कुन्नूर (Coonoor, Tamil Nadu) येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या (Air Force helicopter) अपघातानंतर आता लोकांना गेल्या वर्षीचा अपघात आठवत आहे. जानेवारी 2020 मध्ये, तैवानच्या (Chief of General Staff of Taiwan) चीफ ऑफ जनरल स्टाफचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. यावेळी हेलिकॉप्टर अपघातात भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आता तिन्ही दलांचे संयुक्त पथक अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहे.

MI-17 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते 12:15 वाजता लँड होणार होतं, मात्र लँडिंगच्या सात मिनिटांपूर्वी त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

19 सेकंदाचा व्हिडिओ

हा संपर्क केवळ हेलिकॉप्टरशी तुटला नाही, तर शूर जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सैनिकांसोबतही तुटला. आता अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की त्या 7 मिनिटात काय घडले?

हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी सुमारे 19 सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला. ज्याचं आता विश्लेषण केलं जात आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर ढगांच्या गर्दीत शिरताना दिसत आहे आणि नंतर अचानक आगीच्या गोळ्याच्या रूपात खाली पडताना दिसतंय. आता अशा परिस्थितीत हा अपघात खराब हवामानामुळे झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अखेर कसं झालं हेलिकॉप्टर क्रॅश?

आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या प्रश्नाबाबत निवृत्त स्क्वॉड्रन लीडर दीप्ती कला यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्या म्हणाल्या धुक्याची घनता (The density of the fog) आणि दृश्यमानता (visibility) याची माहिती वैमानिकाला आधीच दिली आहे आणि त्याचे निकष आहेत. जर दृश्यमानता कमी असेल तर उड्डाण होणार नाही किंवा मधेच हवामान खराब झाले तर काय करायचे ते पायलटला माहीत असते. पायलट एकतर जवळपास लँड करतील किंवा हवामान चांगले होईपर्यंत प्रतीक्षा करतात. प्रत्येक गोष्टीची माहिती वैमानिकाला दिली जाते.

अशा स्थितीत दुसरा प्रश्न असा पडतो की हेलिकॉप्टरचे इंजिन बिघडल्याने अपघात झाला का?

या प्रश्नाला उत्तर देताना निवृत्त ग्रुप कॅप्टन अमिताभ रंजन म्हणाले की, MI-17 हेलिकॉप्टरची खासियत म्हणजे त्याच्या एका इंजिनमध्येही इतकी ताकद आहे की ते कुठूनही बाहेर पडू शकते, उतरू शकते. हे दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, दोघेही सतत एकत्र काम करतात. असं नाही की इर्मरजन्सीच्या वेळी एक बंद झाल्यास दुसरा सुरु होतो.

'दोन्ही इंजिन एकत्र बंद होणार नाहीत'

त्यांनी सांगितले की, जहाजाचे सॅम्पलिंग उड्डाणाच्या अगदी आधी केले जाते, जर काही कारणास्तव इंधनात असा घटक आला की एक इंजिन बंद पडलं तर दुसरं इंजिन बंद पडत नाही. दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडू शकत नाहीत.

हेही वाचा- टेपरेकॉर्डरच्या आवाजावरुन वाद, मुंबईत तरुणानं केला शेजारच्याचा गेम खल्लास

तीन वर्षे IAF ची MI-17 V5 हेलिकॉप्टर उडवणारे निवृत्त ग्रुप कॅप्टन अमिताभ रंजन यांनी इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारली.

आता अशा स्थितीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की त्या सात मिनिटांत काय घडले? ज्याचा तपास हवाई दलाच्या वतीने एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील टीम करत आहे.

ब्लॅक बॉक्स उघडेल प्रत्येक रहस्य

हेलिकॉप्टर अपघाताशी संबंधित सर्व अचूक माहितीसाठी, आता सर्व आशा कोणत्याही विमान-हेलिकॉप्टरची सर्व रहस्ये कॅप्चर करणाऱ्या ब्लॅक बॉक्सकडून आहेत. असे मानले जाते की ब्लॅक बॉक्स प्रत्येक क्रॅशचे कारण 70 टक्क्यांपर्यंत स्पष्ट करतो.

या अपघाताबाबत निवृत्त ग्रुप कॅप्टन अमिताभ रंजन म्हणाले, माझा अनुभव सांगतो की, हे हेलिकॉप्टर उडत असताना जमिनीवर पडले आहे. या हेलिकॉप्टरची इंधन क्षमता 2600 लीटर असून ते ताशी 800 लिटर वापरते. हेलिकॉप्टरचे टेक ऑफ आणि क्रॅश दरम्यान 15 मिनिटांचा कालावधी होता, म्हणजे फारच कमी इंधन खर्च झाले, सुमारे 2000 लिटर इंधन शिल्लक राहिले असते जे जाळण्यासाठी पुरेसे आहे, आग भीषण होऊ शकते.

हेही वाचा- Camphor Benefit: पूजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसात होतील गायब 

पुढे ते म्हणाले, मला जे समजलं आहे ते असे आहे की तेथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असावी. ज्यामुळे पायलटला डोंगराच्या मधोमध धुक्यात जावे लागले. जळालेल्या हेलिकॉप्टरच्या मागील भागात बसवण्यात आलेले डेटा रेकॉर्ड तपासल्यानंतरच अपघाताचे कारण समजेल.

First published:

Tags: Tamil nadu