मराठी बातम्या /बातम्या /देश /Monsoon Update: यंदाचा पावसाळा अतिधोकादायक; लक्षावधी वर्षांतील माहितीच्या आधारे निष्कर्ष

Monsoon Update: यंदाचा पावसाळा अतिधोकादायक; लक्षावधी वर्षांतील माहितीच्या आधारे निष्कर्ष

Weather Forecast in India: मागील आठवड्यात केरळात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यापासून संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण आहे. अशातच देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा पावसाळा अधिक धोकायदायक असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 07 जून: मागील आठवड्यात केरळात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यापासून संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) सुधारित अंदाजानुसार, यावर्षी देशात 101 टक्के मुबलक पाऊस पडण्याची (Rain in India) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता जवळपास नसल्याची माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

अशातच देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा पावसाळा अधिक धोकायदायक (This year's rains is extremely dangerous) असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. दशलक्षावधी वर्षातील माहितीच्या आधारे काढलेल्या निष्कर्षावरून यंदाचा पावसाळा अधिक धोकादायक असल्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षातील मान्सूनसंदर्भात केलेल्या संशोधनावरून हवामान बदलामुळे पावसाळ्यावर परिणाम होत असल्याची माहितीही शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. जागतिक तापमान वाढ, हवेतील वाढती आर्द्रता, हरितगृह वायूचे उत्सर्जन यामुळे हवामान तप्त होत असून याचा परिणाम मान्सूनवर दिसत आहे.

हे ही वाचा-Monsoon Update: पुण्यासह अलिबागपर्यंत पोहोचला मान्सून; 3तासांत मुंबईत बरसणार सरी

भारतीय उपखंडातील लोकांसाठी यंदाच्या जोरदार पावसाचे परिणाम विध्वंसक होऊ शकतात, असा इशारा जर्मनीतील पॉट्सडॅम इन्स्टिट्यूटमधील जागतिक हवामान विषायाचे प्राध्यापक अँडर्स लेव्हरमन यांनी दिला आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे मान्सूनबाबत अनिश्चितता तयार होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासमोर हे एक मोठे आव्हान उभं ठाकलं आहे.

हे ही वाचा- Monsoon Update: यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

'जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस' या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधामध्ये, मागील दशलक्षावधीतील माहितीच्या आधारे मांडण्यात आलेल्या सिद्धांतानुसार भविष्यातील पावसाळ्याबाबत भाकीत करण्यात आलं आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी बंगलच्या उपसागरातील मातीचा वापर करत हे संशोधन केलं आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदी महासागराच्या उत्तरेला बंगालच्या उपसागरात साचलेल्या मातीच्या थराखाली 200 मीटर खोदकाम करून हे नमुने गोळा केले आहेत. या नमुन्यांतून त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. पृथ्वी, पर्यावरण आणि ग्रह विज्ञानाचे ब्राऊन विद्यापीठातील प्राध्यापक स्टीव्हन क्लेमेन्स यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Monsoon, Weather forecast, Weather update