'ही' महिला पुरवायची आसारामला मुली

'ही' महिला पुरवायची आसारामला मुली

या महिलेचं नाव शिल्पी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिल्पी उच्चशिक्षीत असून तिने मानसशास्त्र विषयात एम. ए केलं आहे. पीडित मुलीवरती वाईट आत्म्यांचं सावट आहे अशी खात्रीच तिच्या घरच्यांना ती पटवून द्यायची

  • Share this:

25 एप्रिल: एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.  पण आसारामपर्यंत मुली पोचवणारीही एक  महिला होती. या महिलेमुळेच मुली आणि त्यांचे कुटुंबिय  मुलींना आश्रमात पाठवायला तयार व्हायचे.

या महिलेचं नाव शिल्पी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिल्पी उच्चशिक्षीत असून तिने मानसशास्त्र विषयात एम. ए केलं  आहे. पीडित मुलीवरती वाईट आत्म्यांचं सावट आहे अशी खात्रीच तिच्या घरच्यांना ती पटवून द्यायची. त्यानंतर मुलीच ब्रेनवॉश करून  मुलींना  आसाराम बापूंकडे पाठवायची असा तिच्यावर आरोप आहे.  शिल्पीचे संपूर्ण कुटुंबच  आसारामांच्या आश्रमात काम करत. शिल्पी ही आसारामचीच मुलगी असल्याच्या वावड्या सर्वत्र  उठत आहे . पण याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाही. आसाराम बापूच्या एका आश्रमात ती  वार्डन म्हणून ही काम करायची.

आता शिल्पीला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.     या प्रकरणी अजून किती लोकं सामील होते हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

 

 

First Published: Apr 25, 2018 04:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading