नवी दिल्ली, 2 एप्रिल : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) विश्लेषणातून असं दिसून आलंय की, भारतानं या वर्षी मार्चमध्ये 121 वर्षांतील सरासरी उष्ण दिवसांची नोंद केली आहे, देशभरातील कमाल तापमान सामान्यपेक्षा 1.86 अंश सेल्सिअस जास्त राहिलं. हा विक्रमी आकडा वायव्य आणि मध्य भारतातील कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे होता.
भारताच्या वायव्य प्रदेशात सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर, मध्य भारतात 1901 पासून दिवसाच्या तापमानाच्या बाबतीत मार्च महिन्यातल्या दुसऱ्या सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हे आकडे तापमान विचलनाचं प्रमाण दर्शवतात, ज्यामुळे मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागात उष्णतेचा प्रभाव वाढला. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेची स्थिती नोंदवली गेली.
हवामानातील हा बदल हवामान संकटाशी जोडला जाऊ शकतो
तज्ज्ञांनी सांगितलं की, वाऱ्याच्या पॅटर्नमधील असामान्य बदल हवामान संकटाचा परिणाम असू शकतात. या उष्णतेचं एक कारण या भागात पाऊस नसणं हेदेखील असू शकतं. मार्च महिन्यात देन वेळा उष्णतेची लाट (heat wave) आली. अँटी-सायक्लॉनिक सर्क्युलेशन असल्यामुळे पश्चिमेकडून उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट पसरली होती. भारतीय हवामान केंद्र पुणेचे शास्त्रज्ञ ओ. पी. श्रीजीत म्हणाले, एकूणच जागतिक तापमानवाढ हे देखील याचं एक प्रमुख कारण आहे. शिवाय, ला नीना घटनांदरम्यानदेखील बरेचदा उच्च तापमानाची नोंद होते.
हे वाचा -
Russia-Ukraine युद्धातून भारताला मोठी संधी, रशियात या भारतीय वस्तूंना मागणी
स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (हवामानशास्त्र आणि हवामान बदल) महेश पलावत यांनी सांगितलं की, यावर्षी मार्चमध्ये उच्च तापमानाचं मुख्य कारण म्हणजे पावसाची कमतरता आणि वायव्य आणि मध्य भारतावर सतत कोरडे आणि उष्ण, पश्चिमेकडील वारे. ढगविरहित आकाश सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात आल्यानं देखील तापमान वाढल्याचं आमच्या निदर्शनास आलं. हवामान थंड होण्याच्या दृष्टीनं कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्यानं एप्रिलमध्येही असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हे वाचा -
रशियाकडून crude oil घेण्याचे काय आहेत फायदे? म्हणूनच भारताला नाही जगाची पर्वा
मार्च महिन्यात संपूर्ण भारतात उष्णतेचा नवा विक्रम
मार्च 2022 मध्ये संपूर्ण देशासाठी सरासरी कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे 33.10 °C, 20.24 °C आणि 26.67 °C होते. तर, 1981 ते 2010 या कालावधीत सरासरी सामान्य तापमान 31.24°C, 18.87°C आणि 25.06°C होतं. वायव्य भारतात, मार्चमधील सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा 3.91 अंश सेल्सिअस जास्त होते. सरासरी किमान तापमान किंवा रात्रीचं तापमान, 1901 नंतरचे दुसरं सर्वोच्च तापमान होतं, जे सामान्यपेक्षा 2.53 °C जास्त होते. सरासरी दैनंदिन तापमान सामान्यपेक्षा 3.22 अंश सेल्सिअसनं दुसऱ्या क्रमांकावर होतं.
- मध्य भारतात हा मार्च महिना कमाल तापमानाच्या बाबतीत 121 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना होता. तर, हा महिना सरासरी तापमानाच्या बाबतीत तिसरा सर्वात उष्ण आणि किमान तापमानाच्या बाबतीत चौथा सर्वात उष्ण महिना होता.
- दैनंदिन सरासरी तापमानाच्या दृष्टीनं पूर्व आणि ईशान्य भारतासाठी हा सर्वात उष्ण मार्च महिना होता; तर किमान तापमानाच्या बाबतीत तो दुसरा आणि कमाल तापमानाच्या बाबतीत चौथा सर्वाधिक उष्ण मार्च महिना होता.
- केवळ द्वीपकल्पीय भारताचं तापमान काहीसं कमी होते: दक्षिणेकडील राज्यांसाठी कमाल तापमानात हा नवव्या क्रमांकाचा उष्ण मार्च महिना होता. सरासरी तापमानाच्या बाबतीत चौथा सर्वात उष्ण मार्च महिना होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.