नवी दिल्ली,ता.04 एप्रिल : आता यापुढे एनडीएमध्ये पुन्हा कधीच परत जाणार नाही असं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी न्यूज18 शी बोलताना स्पष्ट केलं. पंतप्रधान कार्यालय कलंकित पक्षांना महत्व देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. माझ्या कामाचं कौतुक माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनीही केलं होतं असंही ते म्हणाले. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू आग्रही होतो, मात्र केंद्र सरकारनं हा प्रस्ताव फेटाळला होता. अविकसित आणि पूर्वोत्तरातली सीमावर्ती राज्य सोडली तर घटनेनुसार असा दर्जा इतर राज्यांना देता येत नाही असा केंद्र सरकारचा युक्तीवाद होता. त्यामुळे चंद्राबाबू नायडूंनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेलुगू देशम् हा एनडीएतून बाहेर पडणारा पहिला पक्ष आहे. विशेष राज्याचा दर्जा देण्याएवजी विशेष पॅकेज देण्याचा प्रस्ताव केंद्रानं ठेवला होता मात्र राजकारणामुळेच चंद्राबाबूंनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण भाजपनं दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Chandrababu naidu, Narendra modi, NDA, Pmo, Telugu desham, आंध्रप्रदेश, एनडीए, चंद्राबाबू नायडू, नरेंद्र मोदी, पीएमओ, भाजप, विशेष राज्य