या सर्वोच्च मुस्लीम संघटनेने मोदी सरकारच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला दिला पाठिंबा

या सर्वोच्च मुस्लीम संघटनेने मोदी सरकारच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला दिला पाठिंबा

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही याचा पुनरुच्चार करत आहोत. कोणतीही फुटीरतावादी चळवळ ही देशाच्या हिताला बाधा आणणारी आहे त्याचबरोबर काश्मीरच्याही हिताची नाही, असंही या मुस्लीम संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतातले मुस्लीम आपल्याच देशाच्या निर्णयाला विरोध करत आहेत, असा कांगावा पाकिस्तानने जागतिक स्तरावर चालवला आहे आणि त्याचा आम्ही निषध करतो, असं जमात उलेमा ए हिंद या मुस्लीम संघटनेनं म्हटलं आहे. काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला या संघटेनेने पाठिंबा दिला आहे.

NRC ला ही पाठिंबा

देशभरातल्या बेकायदेशीर नागरिकांची यादी काढून नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन तयार करण्याच्या प्रक्रियेलाही या संघटनेने पाठिंबा दिला आहे. यामुळे देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लोकांना आळा बसेल, असं या संघटनेचं म्हणणं आहे. आसाममध्ये ही नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर 19लाख लोक बेकायदेशीररित्या राहत असल्याचं लक्षात आलं.

'काश्मीर भारताचा अविभाज्य भाग'

कोणतीही फुटीरतावादी चळवळ ही देशाच्या हिताला बाधा आणणारी आहे त्याचबरोबर काश्मीरच्याही हिताची नाही, असंही या मुस्लीम संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. काश्मिरी लोकांची सांस्कृतिक ओळख आणि सन्मान जपावा या मताचे आम्ही आहोत पण काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला मात्र आमचा पाठिंबा आहे, असं मुस्लीम विचारवंतांचं म्हणणं आहे.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही याचा पुनरुच्चार करत आहोत. पाकिस्तानला काश्मीर उद्ध्वस्त करायचं आहे. ते आपल्या राजकारणासाठी काश्मीरचा वापर करून घेत आहेत,असंही त्यांनी म्हटलं आहे.

=========================================================================================

पुणेकरांना मानलं, तुफान गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading