काँग्रेसच्या या मराठमोळ्या नेत्याने राहुल गांधींना दिला झटका, कलम 370 हटवण्याचं केलं समर्थन

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं आहे. त्याचबरोबर काश्मीरचं विभाजनही करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेसमध्ये मात्र दोन गट पडल्याचं समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 08:12 PM IST

काँग्रेसच्या या मराठमोळ्या नेत्याने राहुल गांधींना दिला झटका, कलम 370 हटवण्याचं केलं समर्थन

मुंबई, 6 ऑगस्ट : काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं आहे. त्याचबरोबर काश्मीरचं विभाजनही करण्यात येणार आहे. हे विधेयक लोकसभेतही मंजूर झालं. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेसमध्ये मात्र दोन गट पडल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत राहुल गांधींना जोरदार धक्का दिला आहे.

इस्लामाबादमध्ये संजय राऊत यांची पोस्टर्स, पाकिस्तानमध्ये हडकंप

जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतामध्ये विलिन करण्यासाठी जी पावलं उचलली आहेत त्याचं मी समर्थन करतो. हे घटनात्मक प्रक्रियेने झालं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे कुणालाही सवाल विचारण्याची संधी मिळाली नसती. हा निर्णय देशहितासाठी घेण्यात आला आहे. मी त्याचं समर्थन करतो, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांच्यासह हरियाणाचे दीपेंद्र हुड्डा, जयवीर शेरगिल, भुवनेश्वर कलिता या काँग्रेस नेत्यांनीही सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. आपलं हे वैयक्तिक मत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, पी. चिदंबरम, शशी थरुर यांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. असं असताना राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे नेते ज्योतिरादित्य शिंदे मात्र विधेयकाच्या बाजूने ट्वीट करतात हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

कलम 370चा काँग्रेसला झटका, विरोध केल्यानं या ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

माझे राजकीय गुरु राम मनोहर लोहिया सुरुवातीपासूनच अनुच्छेद ३७० चा विरोध करत होते. आम्ही विद्यार्थी आंदोलनात याला विरोध करायचो. माझं वैयक्तिक मत आहे की हा एक राष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. उशीर झाला असला तरी स्वातंत्र्यादरम्यान झालेली चूक सुधारण्यात आली आहे, असं जनार्दन द्विवेदी यांनीही म्हटलं होतं.

===================================================================================================

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...