01 मार्च : साता समुद्रापार आपल्या सगळ्या चाहत्यांपासून लांब श्रीदेवी यांचं शनिवारी दुबईत निधन झालं. त्यानंतर तब्बल तीन दिवस त्यांच्या अकाली जाण्याचा तपास होत राहिला. आणि अखेर मंगळवारी रात्री त्यांच पार्थिव भारतात दाखल झालं. दुबईच्या सगळ्या सरकारी नियमांतून श्रीदेवी यांना भारतात आणण्यासाठी एका केरळच्या व्यक्तीने मदत केली. हो, त्या व्यक्तीचं नाव आहे 'अशरफ शेरी थामारासरी'. खरंतर अशरफ हे दुबईमध्ये आवश्यक असणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांसाठी मदत करतात.
अशरफ हे मुळचे केरळचे आहेत. ज्यावेळी श्रीदेवी यांचं पार्थिव संयुक्त अरब अमिरातमध्ये एका शवगृहात ठेवण्यात आलं होतं, तेव्हा त्यांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी अशरफ यांनी कपूर कुटुंबीयांना खूप मदत केली. अमिरात मरण पावलेल्या सर्व गरीब आणि श्रीमंतांना मृतदेह त्यांच्या देशात पाढवण्यासाठी अशरफ मदत करतात. अगदी कर्जाच्या डोंगरात बुडालेल्या कुटुंबांनाही अशरफ यांनी मदत केली आहे.
44 वर्षीय अशरफ यांनी आजपर्यंत 4,700 मृतदेहांना जगातल्या 38 देशांमध्ये पाठवण्यासाठी मदत केली आहे. मंगळवारी रात्रीच श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबतच 5 इतर मृतदेहांनाही त्यांनी त्यांच्या देशात पाठवण्यासाठी मदत केली आहे. त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असं अशरफ म्हणतात.
संकटसमयी सगळ्यांना मदत केल्यावर त्यांचे आशिर्वाद आपल्या मिळतात. अशी यामागची त्यांची भावना आहे.