काश्मिरी युवकाच्या ट्विटवर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर, युवकाने डिलीट केलं अकाऊंट

काश्मिरी युवकाच्या ट्विटवर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर, युवकाने डिलीट केलं अकाऊंट

पासपोर्ट आणि व्हिसा संबंधित समस्यांसाठी, भारत आणि परदेशातील नागरिक अनेकदा ट्विटरच्या सहाय्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत मागतात आणि सुषमा स्वराज त्यांना मदतही करतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : पासपोर्ट आणि व्हिसा संबंधित समस्यांसाठी, भारत आणि परदेशातील नागरिक अनेकदा ट्विटरच्या सहाय्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत मागतात आणि सुषमा स्वराज त्यांना मदतही करतात. अश्याच प्रकारे एका काश्मिरी तरुणाने सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीची आशा व्यक्त केली. पण सुषमा यांनी त्याला असं काही उत्तर दिलं की त्या तुरूणाला त्याचं ट्विटर प्रोफाईलच बदलावं लागलं आणि काही वेळानेतर त्याने त्याचं ट्विटर अकाऊंटच डिलीट केलं.

फिलिपींसच्या मनालीमध्ये राहणाऱ्या काश्मीरच्या शेख अतीक या तुरूणाने खराब झालेलं पासपोर्ट नवीन बनवण्यासाठी सुषमा स्वराज यांना ट्विट केलं. माझी प्रकृती बिघडत असल्याने मला लवकरात लवकर माझ्या देशात, भारतात यायचं आहे त्यासाठी मला मदत करा असं त्याने त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्याच्या या ट्विटवर सुषमा स्वराज यांनीही त्याला उत्तर दिलं, त्या म्हणाल्या की, 'तुम्ही जर जम्मू-काश्मीरचे नागरिक आहात तर तुम्हाला तात्काळ मदत केली पाहिजे. पण तुमच्या प्रोफाईलमध्ये लिहलं आहे की तुम्ही ''भारत अधिकृत काश्मीर''चे नागरिक आहात. पण असं तर कोणतंच ठिकाण नाही आहे. '

सुषमा यांच्या या उत्तरानंतर शेख अतीकने त्याच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये जम्मू-काश्मीरचा नागरिक असल्याचा बदल केला. त्यावर सुषमा यांनी पुन्हा ट्विट केलं आणि म्हणाल्या की, 'तुम्ही प्रोफाईलमध्ये बदल केल्यामुळे मला आनंद झाला. शेख हे जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे भारतीय नागरिक आहे, त्यांना तात्काळ मदत करा.'

दरम्यान, हे ट्विट त्यांनी फिलिपींसमध्ये राहणाऱ्या भारतातील राजदूतलाही टॅग केले. पण हे सगळं झाल्यावर मात्र शेख अतीकने त्याचं ट्विटर अकाऊंटच डिलीट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 01:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading