Home /News /national /

'यह तो पहली झांकी है, काशी-मथुरा बाकी है'; बाबरी प्रकरणानंतर आचार्य धर्मेंद्र यांचा इशारा

'यह तो पहली झांकी है, काशी-मथुरा बाकी है'; बाबरी प्रकरणानंतर आचार्य धर्मेंद्र यांचा इशारा

आज विशेष कोर्टाने बाबरी विध्वंस प्रकरणात 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर मशीद गायब झाली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे

    नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : बाबरी विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयानंतर आरोपींच्या यादीत नाव असलेले आचार्य धर्मेंद्र म्हणाले की, सत्याचा विजय झाला. आम्ही सर्वजण मिळून सर्व जुने डाग आहेत ते स्वच्छ करू. यह तो पहली झांकी है, काशी-मथुरा बाकी है, अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला. आचार्य धर्मेंद्र यावेळी म्हणाले की, जेथे-जेथे डाग आहेत, ते धुवून स्वच्छ केले जातील. आचार्य पुढे म्हणाले की, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात आचार्य धर्मेंद्र यांच्याशिवाय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती,  विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह प्रकाश शर्मा यांची नावं आरोपींच्या यादीत होती. हे ही वाचा-'जय श्रीराम' असा जयघोष करत लालकृष्ण आडवाणी यांनी केलं निकालाचं स्वागत याशिवाय विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, सुधीर कुमार कक्कड आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर यांचीही नावे होती. या सर्वांची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने 28 वर्षानंतर आपला निर्णय सुनावला. हे ही वाचा-बाबरी मशीद विध्वंस हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण- माधव गोडबोले कोर्टाने सर्व 32 आरोपींची निर्दोष सुटका केली. कोर्टाने असेही सांगितले की, मशिदीचा विध्वंस नियोजित नव्हता. कोर्ट पुढे म्हणालं की, कोणत्याही आरोपीविरोधात पुरावा मिळालेला नाही.  आज तकने संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.कोर्टाने सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह आणि सतीश प्रधान यांच्याव्यतिरिक्त सर्व 26 आरोपी निर्णय देताना कोर्टात उपस्थित होते. यावेळी न्यायाधीशांनी सांगितलं की, आरोपींच्या ऑडिओमध्ये आवाज सुस्पष्ट ऐकून येत नव्हती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या